Today’s Horoscope 16 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 December 2022
वार – शुक्रवार.
16.12.2022
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- कालाष्टमी.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 7.34 पर्यंत, नंतर उत्तरा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह 14.04 पर्यंत, नंतर कन्या.
—————————————-
मेष – (शुभ रंग- राखाडी)
तुमच्या प्रामाणिक मेहेनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. काही बिकट प्रश्न आज तुम्ही सहजच सोडवाल. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. आज उत्साह पूर्ण दिवस.

वृषभ (शुभ रंग- निळा)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहाल. स्थवराची खरेदी विक्री फायद्यात राहील. आज मातोश्रींकडून लाभ संभवतो.

मिथुन (शुभ रंग- पिस्ता)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात. आज घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा.

कर्क (शुभ रंग- सोनेरी)
दिवसाच्या पूर्वार्धातच काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज प्रवासाची दगदग टाळलेली बरी.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झेपणारी कामे तुम्ही सहजच पूर्ण करू शकाल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा.

कन्या (शुभ रंग- चंदेरी)
आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे आवश्यक आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्यास शब्द देऊन अडकू नका. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या.

तूळ (शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी काही आनंददायी घटना घडतील. सहकारी मित्र तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळावे.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम) – Today’s Horoscope 16 December 2022
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कामाला लागा. वडील आज तुम्हाला योग्य सल्ले देतील.

धनु (शुभ रंग- आकाशी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा होईल पण तसे करू नका. स्वतःवर संयम ठेवा.

मकर (शुभ रंग-आकाशी)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नसून मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकलले तर बरे होईल. आज जेष्ठ मंडळींना सत्संगातून मनःशांती मिळेल.

कुंभ (शुभ रंग – केशरी )
सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असायला हवी .

मीन (शुभ रंग – मोरपंखी)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pune News : शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.