Todays Horoscope 16 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – गुरूवार, दि. 16.06.2022 (Todays Horoscope 16 June 2022)

  • शुभाशुभ विचार – 20 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा 12.37 पर्यंत नंतर उत्तराषाढा.
  • चंद्र राशी – धनु 17.55 पर्यंत नंतर मकर.

———————————————-

आजचे राशीभविष्य – (Todays Horoscope 16 June 2022)

मेष – (शुभ रंग -निळा)

सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा करू नका. कर्म करीत रहा फळ मिळेलच. आजी-आजोबांनी फार खोलात न शिरता फक्त नातवंडात रमावे.

वृषभ – (शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी काही पूर्वी केलेल्या चुका निस्तराव्या लागतील. कोणाकडून कसली अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळच येणार नाही.

मिथुन – (शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. आज जोडीदार तुमच्यावर अगदी बेहद खुश असेल. गृहोद्योगातून चांगली कमाई होईल.

कर्क – (शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या प्रचंड व्यापामुळे महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुणाकडे सल्ले मागायला जाऊच नका. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील.

सिंह – (शुभ रंग – मोतिया)

आज तुम्हाला नेहमीच्या त्याच त्या कामाचा कंटाळा येईल. हौशी मंडळी तर आज चक्क कामावर दांडी मारून जीवाची मुंबई करतील. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

कन्या – (शुभ रंग – लाल)

आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. सासूबाईंनी केलेल्या कौतुकामुळे गृहणी सुखावतील. काही भाग्यवंतांना नव्या घराच्या चाव्या मिळतील.

CM Uddhav Thackeray : छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तुळ – (शुभ रंग – आकाशी)

आज तुम्हाला एखाद्या अर्जंट कामासाठी अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर डोके शांत ठेवा. वाद टाळा. शेजारी आज फारच गोड गोड बोलतील.

वृश्चिक – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. आज नेत्यांची भाषणे प्रभावी होतील. प्रवास मात्र कंटाळवाणे होतील.

धनु – (शुभ रंग- जांभळा)

तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. एखाद्या प्रश्‍नात सामंजस्याने मार्ग काढावा लागेल.पत्नीचे सल्ले डावलू नका. श्वसनाचे विकार असतील तर काळजी घ्या.

मकर – (शुभ रंग- भगवा)

असा एखादा खर्च उद्भवेल कि जो टाळता येणे शक्य नाही. घरातील थोरांचे ही सल्ले विचारात घेणे आवश्यक राहील. ज्येष्ठ मंडळींनी अती दगदग टाळावी. आज थकवा जाणवेल.

कुंभ – (शुभ रंग- मरून)

व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल. संतती बाबत काही आनंददायी घटना घडतील. जे मनी योजाल ते तडीस न्याल. गर्भवतींना मनोवांछित संतती चा लाभ होईल.

मीन – (शुभ रंग – नारंगी)
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल इतरांना जे अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवाल. आज तुमच्यासाठी यशदायी दिवस आहे. श्रद्धाळू ना उपासनेचे फळ मिळेल.

!! शुभम भवतु !!
श्री जयंत कुलकर्णी
फोन – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.