Today’s Horoscope 16 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – रविवार. 16 मे  2021

  • शुभाशुभ विचार – 10 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष — सामान्य दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र –  आद्रा 11.14 पर्यंत, नंतर पुनर्वसु.
  • चंद्र राशी –  मिथुन.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- मोतिया)

आज संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. भावाभावात सामंजस्य राहील. गृहिणींनी सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.

.

वृषभ – ( शुभ रंग- तांबडा)

कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. दैव आज तुमच्याच बाजूने आहे.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल.  तुमचा उत्साह व कार्यक्षमताही वाढेल. घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)

हट्टीपणा सोडा, मनाच्या लहरीपणास आवर गरजेचा आहे. अति महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या तब्येतीकडे ही लक्ष द्यायला हवे. उधारी उसनवारी आज नको.

सिंह – ( शुभ रंग- हिरवा)

काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. आर्थिक आवक उत्तम असल्याने तुमची मनस्थिती चांगली असेल. जुन्या गुंतवणुकीतून मनाजोगता लाभ होईल.

कन्या – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. वाढीव जबाबदाऱ्या मात्र टाळता येणार नाहीत. मित्र आज दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत.

तूळ – ( शुभ रंग -आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपले काम बिनचूक कसे होईल यावर लक्ष देणे हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नास्तिक ही देवाला एखादा नवस करतील.

वृश्चिक – ( शुभ रंग – जांभळा)

काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. आज थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हिंग टाळा. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ झेपणारा नाही.

धनु – ( शुभ रंग- निळा)

आज तुमची तब्येत जरी नरम असली तरी तुमच्या कामातील उत्साह मात्र दांडगा राहील. व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर – ( शुभ रंग – चंदेरी)

आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर ती वसूल होतील. मामा मावशी यांच्याकडून काहीतरी शुभवर्तमान कळेल.

कुंभ – ( शुभ रंग -गुलाबी)

आज आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. काही फसव्या संधी येऊ शकतात. हातचे सोडून मृगजळामागे धावण्या पूर्वी पूर्ण विचार करावा. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

मीन – ( शुभ रंग- भगवा)

उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. गृहिणींना शारीरिक थकवा जाणवेल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.