Todays Horoscope 16 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार सोमवार, दि. 16.05.2022

  • शुभाशुभ विचार – 13 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – बुद्ध पौर्णिमा.
  • राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – विशाखा 13.18 पर्यंत नंतर अनुराधा.
  • चंद्र राशी – तुळ सकाळी 07.54 पर्यंत नंतर वृश्चिक.

—————————————-

आजचे राशीभविष्य

मेष ( शुभ रंग – मोरपिशी)

आज कामाचा पसारा आवाक्याबाहेर जाईल. सतत कामामुळे दिवस कंटाळवाणा जाईल. मनात काही नकारात्मक विचार येतील. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.

वृषभ – ( शुभ रंग – जांभळा )

इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आज संध्याकाळी लवकर घर गाठा. जोडीदार आज आतुरतेने वाट पाहात असेल.

मिथुन- ( शुभ रंग – मरून )

नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागेल. ज्येष्ठांना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.

कर्क- ( शुभ रंग- मोतिया )

आर्थिक अडचणींवर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील.

सिंह – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा वाद टाळा. मुलांचे लाड करताना त्यांच्या शिस्तीस ही प्राधान्य द्या.

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार आज नकोत. महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.

तूळ- ( शुभ रंग- केशरी )

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. वाणीत गोडवा असणे हिताचे राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील. आज तुम्ही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.

धनु – ( शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. पायपीट होईल.

मकर- ( शुभ रंग- आकाशी )

आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. इच्छापूर्ती चा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा.

कुंभ- ( शुभ रंग- हिरवा )

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रश्न सहज सोडवाल. आज पिताश्रींनी दिलेले सल्ले विचारात घ्या.

मीन – ( शुभ रंग- पांढरा)

ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपुन वापरावी. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. तरुणांनी कुसंगत टाळावी. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल सावध रहा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.