Today’s Horoscope 16 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 16 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख – 16.05.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 01.30  ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – मघा 18.24 पर्यंत नंतर पूर्व फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह. 

—————————–

मेष ( शुभ रंग- पांढरा)

स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. कलाकारांना विविध संधी चालून येतील. काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही आज मौजमजेला प्राधान्य देतील.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक सदस्यांत सुसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पद राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज तुम्हाला घरातच सापडण्याची शक्यता आहे.

मिथुन (शुभ रंग – निळा)

आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून द्या.

कर्क ( शुभ रंग- राखाडी)

उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. तुमचा उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.

सिंह ( शुभ रंग- जांभळा)

जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई न करता इतरांचेही विचार ऐकून घ्या. कायदा मोडू नका.

कन्या (शुभ रंग- सोनेरी)

असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात असा एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो जो टाळता येणार नाही. काहीजण सहकुटुंब दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

तूळ (शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोडं तरी जास्तच असेल. नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर आजचा दिवस अति उत्तम आहे.

वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)

भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणेच आज योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल. किरकोळ तब्येतीच्या तक्रारीही दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

धनु (शुभ रंग- क्रीम)

सहज काही मिळाले नाही तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की लाभेल सज्जनांचे पाय घराला लागतील वडीलधाऱ्या मंडळींना मात्र दुखावू नका.

मकर (शुभ रंग- पिस्ता)

कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा. काही चुकीची माणसे आज तुमच्या संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेही धाडस करू नका. फक्त नाकासमोर चाला.

कुंभ ( शुभ रंग- मरून)

कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. जोडीदाराला अभिमानास्पद वाटण्याजोगी एखादी कामगिरी तुमच्या हातून घडेल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना तुम्ही आज यशस्वीपणे कराल.

मीन (शुभ रंग- डाळिंबी)

नोकरीच्या ठिकाणी आज बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्या. हितशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.