Today’s Horoscope 16 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार…. शुक्रवार. दिनांक…16.10.2020

  • शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस
  • आज विशेष – दर्श अमावस्या
  • राहू काळ –  सकाळी 10.30 ते 12.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल
  • आजचे नक्षत्र – हस्त 14.58 पर्यंत नंतर चित्रा.
  • चंद्र राशी – कन्या.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – राखाडी)
नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. तब्येतही जरा नरमच असल्याने आजचा दिवस कंटाळवाणा जाईल. काही मोफत सल्लागार माणसे उगीच डोक्याला ताप देतील.

वृषभ – (शुभ रंग – मरून)
नवीन ओळखी व्यवसायवृद्धीसाठी फायदेशीर ठरतील. विरोधकांशी धूर्तपणे वागून स्वतःचा स्वार्थ साधून घ्याल. आज तुम्ही जरा मौजमजेस प्राधान्य द्याल.

मिथुन – (शुभ रंग – हिरवा)
कुटुंबीयांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. मुले आज अभ्यासास प्राधान्य देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)
कोर्टकचेरीची कामे पुढे सरकतील. शेजाऱ्यांकडून काही सुवार्ता येतील. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. प्रॉपर्टीचे व्यवहार आज नकोत.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. वेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कठोरपणे बोलून कोणाचे मन दुखवू नका.

कन्या – (शुभ रंग – पिस्ता)
आज तुम्ही एखादी क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. विरोधक तुमच्या चुका काढतील. संयम ढळू  देऊ नका. पत्नी आज योग्य तेच सल्ले देणार आहे.

तूळ – (शुभ रंग – मोतिया)
उच्च अधिकारी वर्गास बढतीबरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. आज खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. काहीजणांना अचानक दूरच्या प्रवासास निघावे लागण्याची शक्यता आहे.


वृश्चिक
 – (शुभ रंग – सोनेरी)
उद्योग व्यवसायात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. मित्र-मैत्रिणी तुमचा शब्द झेलतील. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल.

धनु – (शुभ रंग – आकाशी)
नोकरीधंद्यात उत्साही दिवस राहील.  योग्य वेळी अधिकार वापरावे लागणार आहेत. प्रतिष्ठितांच्या ओळखी कामी येतील.  आज एखाद्या मित्रांस मदत कराल.

मकर – (शुभ रंग – निळा)
दैनंदिन कामातही अडथळे येणार आहेत आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. काही येणी असतील तर मागितल्यावर वसूल होतील.


कुंभ
– (शुभ रंग – लाल)
आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार उद्यावरच ढकलले तर बरे होईल. जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.

मीन – (शुभ रंग – क्रीम)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. नोकरदारांना ऑफिसमध्ये साहेबांचे व घरात पत्नीचेही मूड सांभाळावे लागतील. संध्याकाळी सत्संगात रमाल.

 

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.