Today’s Horoscope 16 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, बुधवार, दिनांक…16 सप्टेंबर 2020

  •  शुभाशुभ…वर्ज्य दिवस.
  • आज विशेष .. चतुर्दशी श्राद्ध
  • राहूकाळ…दुपारी 12 ते 01.30
  • दिशा शूल…उत्तरेस असेल.
  • नक्षत्र… मघा 12.21 पर्यंत नंतर पूर्वा
  • आजची चंद्र राशी… सिंह.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – पांढरा)
आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लिष्ट कामेही सोपी होतील. आज कार्यक्षेत्रात अनेक सुसंधी चालून येणार आहेत, त्यांचा योग्य फायदा घेणे हे तुमच्याच हाती आहे.


वृषभ – (शुभ रंग – सोनेरी)
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्त्वाच्या कामानिमित्त आज बरीच पायपीट होईल. काही बिले भरावी लागतील देणी द्यावी लागतील.

 

मिथुन – (शुभ रंग – मोरपंखी)
सगळ्याच दृष्टीने अनुकूल असा हा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्हाला जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. हितशत्रू आज पळ काढणार आहेत.

 

कर्क – (शुभ रंग – चंदेरी)
नोकरदारांना अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्य निश्चितच दखल घेतली जाईल. तरुणांच्या अंगभूत गुणांना वाव मिळेल. छान दिवस.

 

सिंह – (शुभ रंग – आकाशी)
घरात वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. मानसिक संतुलन ढळू देऊ नका. आज तुम्हाला एकांत हवाहवासा वाटेल.

 

कन्या(शुभ रंग – हिरवा)
मोठ्या आर्थिक उलाढाली उद्यावर ढकलणे हिताचे राहील. दूरच्या प्रवासात निघाला असाल तर सावध रहा. आपल्या किमती वस्तू सांभाळा. अनोळखी व्यक्तींवर विश्वास नको.

 

तूळ – (शुभ रंग – राखाडी)
आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती तुमच्या मनास आनंद देतील. आप्तस्वकियात आज तुमच्या शब्दाला मान राहील.

 

वृश्चिक – (शुभ रंग – जांभळा) कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढलेला आहे, नवीन झालेल्या मैत्रीत लगेच विश्वास ठेवू नका. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. कुसंगत टाळावी.

 

धनु – (शुभ रंग – तांबडा)
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही व आनंदी राहील. उच्चशिक्षित तरुणांना विदेश गमनाच्या संधी खुणावतील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील.

 

मकर – (शुभ रंग – भगवा)
आज दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. उद्योग-व्यवसायात आवक पुरेशी राहील. आज कोणतेही धाडस करू नका. प्रेम प्रकरणात नसती आफत होणार आहे.

 

कुंभ – (शुभ रंग – मोतिया)
उद्योग व्यवसायात भागीदारांशी एकमत असणे गरजेचे आहे.  देण्याघेण्याच्या व्यवहारात चोख रहा. आज शक्य झाल्यास प्रवास टाळाच. हितशत्रू आज नमते घेतील.

 

मीन – (शुभ रंग – डाळिंबी)
कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील. संध्याकाळी बहुतेक डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो.

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.