Today’s Horoscope 17 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार -शनिवार. 17 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
  • आज विशेष –साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मृग.
  • चंद्र राशी –  13.09 पर्यंत वृषभ, नंतर मिथुन.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

सकाळी पैशांनी भरलेले खिसे आज दुपारनंतर रिकामे होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चाला आवर घालायला हवा. नोकरदारांना बढती बरोबर बदली ही स्वीकारावी लागेल. विद्यार्थ्यांना प्रयत्न वाढवावे लागतील.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

आज दुपारनंतर अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. भावंडात काही व्यावहारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. पण यावर सुसंवादाने मार्ग निघेल. मात्र तडजोड करावीच लागेल.

 

मिथुन – (शुभरंग- मोरपंखी)

काल पासून एखादी वस्तू हरवली असेल तर ती आज परत शोधा, दुपारनंतर ती सापडू शकेल. घरातील थोर मंडळी आज सामंजस्याने वागतील. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

 

कर्क – ( शुभ रंग – डाळिंबी)

उद्योग व्यवसायात आज मनाजोगती धनप्राप्ती होईल. काही नवीन हितसंबंध तयार होतील. मित्र आज दिलेली आश्वासने पळतील. नाती सांभाळायची असतील तर फार खोलात न शिरता गोड गोड बोला.

सिंह – ( शुभ रंग- पिस्ता)

आज हौस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल. तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावे.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ रंग – सोनेरी)

व्यवसायात मोठ्या आर्थिक उलाढाली करताना भागीदारांना विश्वासात घ्या. रखडलेली शासकीय कामे दुपारनंतर गती घेतील. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेला पैसा जपून वापरावा.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

आज मनाच्या द्विधा अवस्थेत कोणतेही निर्णय घेण्याची घाई करू नका. विरोधकांना व स्पर्धकांनाही कमजोर समजू नका. घरात वडीलधार्‍या मंडळींच्या हो ला हो करून विषय संपवलेला बरा.

वृश्चिक –  ( शुभ रंग- केशरी)

वैवाहिक जीवनात एकमत असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. आज धाडसाची कामे टाळा. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.

धनु – ( शुभ रंग – चंदेरी)

केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. मागून नावे ठेवणार्‍या मंडळींकडे दुर्लक्ष करा. वैवाहिक जीवनात संध्याकाळी जुन्या आठवणी ताज्या कराल.

मकर – (  शुभ रंग- क्रीम)

काही खोटी स्तुती करणारी माणसे भेटतील, सतर्क राहा. आज फक्त आपला स्वार्थ बघा. मित्रांना पार्टी आज नको. एखादा जुना आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.

कुंभ – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बर्‍याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. आशादायी दिवस असून आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

मीन – ( शुभ रंग – मरून )

आज रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य दिले तर बरे होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. ऑफिस मधील महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा. तरुणांनी गैरवर्तन टाळावे.

 

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.