Today’s Horoscope 17 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  बुधवार, ​दि​. 17 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार — सामान्य दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अश्विनी २३.४९ पर्यंत नंतर भरणी.
  • चंद्र राशी –  मेष.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – पिस्ता )

एखाद्या चांगल्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल. रिकामटेकडी चर्चा मात्र टाळा कारण त्यातून फक्त वाद होतील.

वृषभ – (शुभ रंग- जांभळा)

काम धंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण त्यांच्या वयाचा मान राखायला हवा. प्रवास करताना मौल्यवान वस्तू सांभाळा.

मिथुन – ( शुभ रंग- मोरपिशी)

आज व्यापारी वर्गाची आवक वाढेल. पूर्वीच्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरी पडेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही आज तुम्ही भारावून जाल. आनंदी दिवस.

कर्क – ( शुभ रंग -डाळिबी)

आपल्या सडेतोड बोलण्याच्या वृत्तीमुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. घराबाहेर वावरतांना डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक  कामे सोपी होतील.

सिंह – ( शुभ रंग- सोनेरी)

उद्योग-धंद्यात स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. थोडा संयम ठेवा. गृहिणींना अति श्रमामुळे थकवा जाणवेल. भक्तीमार्गात असणार्‍यांना एखादी प्रचिती येईल.

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल. काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल.

तूळ – (शुभ रंग- गुलाबी)

आज दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला अपेक्षित असलेल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल. विवाह विषयक बोलणी आज सकारात्मकतेने पार पडतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी)

आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. प्रेम प्रकरणे  डोक्याला मनस्ताप देतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका.

धनु – ( शुभ रंग- क्रीम)

कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. विद्यार्थ्यांना एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास आवर्जून वेळ देतील, त्याचप्रमाणे आपल्या सौंदर्याची ही काळजी घेतील.

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

वास्तु किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्यायला हवे.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

कार्यक्षेत्रात हितशत्रूंच्या उपद्रव वाढेल. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. घरा बाहेर वावरताना क्रोधावर लगाम गरजेचा. आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणे हेच हिताचे राहील

मीन – ( शुभ रंग- मरून)

आज हातात पैसा खेळता राहील आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करू शकाल मनसोक्त खर्च करून चैनी व विलासी वृत्ती जोपासाल. .
संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.