Today’s Horoscope 17 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार रविवार. …. ​दि​.  17 जानेवारी 2021

  • शुभाशुभ विचार – ०८ नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी ४.३० ते ६.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र –  पूर्वाभाद्रपदा.
  • चंद्र राशी – कुंभ २५.१६ पर्यंत.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- मरून)
पत प्रतिष्ठा वाढेल, आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाचा मान राहील. आज जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. काही जण सहकुटुंब प्रवासाचा आनंद घेतील.

वृषभ – (शुभ रंग- डाळिंबी)
कार्यक्षेत्रात महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर केवळ स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांना प्राधान्य देणे गरजेचे राहील. आज तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. संध्याकाळी पत्नी आतुरतेने घरी वाट पाहिल.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)
व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेल. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

कर्क – ( शुभ रंग -गुलाबी)
वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात पण फार ताणून धरू नका. सासुरवाडी कडून आज काहीतरी लाभ संभवतो. गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहन चालवताना शिस्त पाळा.

सिंह- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
इतरांच्या भानगडीत न डोकावता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्यात आपल्याला काही कळत नाही त्यात अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. मनासारख्या घटना मी तुमची उमेद वाढेल.

कन्या – (शुभ रंग -चंदेरी)
कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवणे गरजेचे. हाती असलेल्या संधींचा सकारात्मकतेने वापर करा.

तूळ – ( शुभ रंग – राखाडी)
आजचा तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. गृहिणींना आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. देण्याघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा.

वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या वेळीच पूर्ण कराल. गृहिणींना आज विविध जाहिराती खर्च करण्यास भाग पडतील.

.

धनु – (शुभ रंग- पिस्ता)
सामाजिक कामे करणाऱ्यांना समाजाकडून आदर प्राप्त होईल. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. एखाद्या कामासाठी आज शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारात सतर्क राहा.

मकर – ( शुभ रंग- आकाशी)
वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल, त्यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. पारिवारिक सौख्यात वृद्धीच होईल. अति सडेतोड बोलणे टाळा कारण त्यामुळे नाती दुरावतिल.

कुंभ – ( शुभ रंग – मोतिया)
रिकामटेकड्या वादविवादात बराच वेळ फुकट जाईल. त्यामुळे महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. आज केवळ स्वप्नरंजनापेक्षा कृतीस प्राधान्य द्या. नकारात्मक विचारांच्या मंडळीं पासून दूरच राहा.

मीन – (शुभारंभ- भगवा)
आपल्या लहरी व हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा. तुमची मते सगळ्यांनाच पटणार नाहीत. एखाद्या प्रसंगी सामंजस्याने मार्ग काढा. नोकरीत वरिष्ठांची नव्हते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.