Todays Horoscope 17 January 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार सोमवार, दि. 17.01.2022

  • शुभाशुभ विचार- 16 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष- शाकंभरी पौर्णिमा,  माघ स्नानारंभ.
  • राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुनर्वसु.
  • चंद्र राशी –  मिथुन 22.02 पर्यंत नंतर कर्क.

_______________________

आजचे राशीभविष्य-

मेष- (शुभ रंग- मोतिया)

आज संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. भावाभावात सामंजस्य राहील. आज काही महत्त्वाचे फोन येतील. मुले अभ्यासाचा कंटाळा करतील.

वृषभ – ( शुभ रंग- तांबडा)

कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल. अनपेक्षित होणारे लाभ मनाला दिलासा देतील. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. दैव आज तुमच्याच बाजूने आहे.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल.  तुमचा उत्साह व कार्यक्षमताही वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. आर्थिक सुबत्ता येईल.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)

हट्टीपणा सोडा, मनाच्या लहरीपणास आवर गरजेचा आहे. अति महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या तब्येतीकडे ही लक्ष द्यायला हवे. उधारी उसनवारी आज टाळा.

सिंह- ( शुभ रंग- हिरवा)

काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. पैशाच्या अभावी बराच काळ रखडलेली कामे मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून मनाजोगता लाभ होईल.

कन्या- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. वाढीव जबाबदाऱ्या मात्र टाळता येणार नाहीत. मित्र आज दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत.

तुळ – ( शुभ रंग -आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपले काम बिनचूक कसे होईल यावर लक्ष देणे हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नास्तिक ही देवाला एखादा नवस करतील.

वृश्चिक -( शुभ रंग – जांभळा)

काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. आज थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हिंग टाळा. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ झेपणारा नाही.

धनु – ( शुभ रंग- निळा)

आज तुमची तब्येत जरी नरम असली तरी तुमच्या कामातील उत्साह दांडगा राहील. व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर – ( शुभ रंग – चंदेरी)

आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर ती वसूल होतील. मामा मावशी यांच्याकडून काही शुभवर्तमान कळेल.

कुंभ -( शुभ रंग -गुलाबी)

आज आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. काही फसव्या संधी येऊ शकतात. हातचे सोडून मृगजळामागे धावण्या पूर्वी पूर्ण विचार करा. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

मीन – ( शुभ रंग- भगवा)

उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. गृहिणींना शारीरिक थकवा जाणवेल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.