Today’s Horoscope 17 June 2022; आजचे राशीभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 June 2022
शुक्रवार.
१७. ०६. २०२२
शुभाशुभ विचार – क्षयदीन
आज विशेष – संकष्ट चतुर्थी. चंद्रोदय २२.२३.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तराषाढा ०९.५६ पर्यंत नंतर श्रवण.
चंद्र राशी – मकर.
—————————————-
आजचे राशीभविष्य – 
मेष – (शुभ रंग – राखाडी )
कार्यक्षेत्रात ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल कराल. काही निर्णय आज झटपट घ्यावे लागतील. आलेली कुठलीच संधी सोडू नका. आज व्यस्त दिवस आहे. मित्रमंडळींना आज दुरूनच राम राम करा.
वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)
वडीलधार्यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाच्या मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी ही नमते घ्यावे लागेल. आज अहंकारास सुट्टीच देणे हिताचे राहील. सत्संग हिताचा राहील.
मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)
आज उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकावू नका.
कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)
बरेच दिवसांनी आज तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असे वातावरण असेल.
सिंह -( शुभ रंग -स्ट्रॉबेरी )
आज तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊन अडकू नका.

कन्या– ( शुभ रंग- पिस्ता)
काही नव्या ओळखी होतील  तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.
तुळ – ( शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा संघर्ष चालूच राहील.
वृश्चिक– ( शुभ रंग- जांभळा)
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आज आई बरोबर मतभेद संभवतात. आज दुरावलेले शेजारी मात्र जवळ येतील.
धनु – (शुभ रंग – मोरपिशी)
आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. जवळपासच्या प्रवासात खोळंबा होऊ शकतो.
मकर– ( शुभ रंग – मरून)
आज हाती पैसा राहील, आवडत्या क्षेत्रात तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आज स्वतःचे लाड पुरवाल. उंची वस्त्र खरेदी कराल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर सापडेल.
कुंभ– ( शुभ रंग- नारिंगी)
आज आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभात वावरताना आपले मौल्यवान ऐवज सांभाळा.
मीन – ( शुभ रंग- डाळिंबी)
हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. दुपारनंतर एखादा लाभ संभवतो.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Todays Horoscope 15 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.