Today’s Horoscope 17 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 March 2023
वार – शुक्रवार.
17.03.2023
शुभाशुभ विचार- 14 नंतर चांगला दिवस

आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ -सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र- उत्तराशाढा
चंद्र राशी – धनु 10.19 पर्यंत नंतर मकर.
—————————————-
मेष (शुभ रंग – तांबडा)
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यस प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात काही तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. मित्रमंडळींना आज दूरच ठेवा.

वृषभ (शुभ रंग – पिस्ता)
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचा विचार कराल. सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील.

मिथुन ( शुभ रंग – जांभळा)
आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमचे हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतेही धाडसाची कामे आज टाळा. आज फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करा.

कर्क (शुभ रंग – निळा)
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ असेल.

सिंह (शुभ रंग – मरून)
कुठलीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमची काही येणी असेल तर ती आज वसूल होऊ शकतील. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ हमखास मिळेल.

कन्या ( शुभ रंग – पिस्ता) – Today’s Horoscope 17 March 2023
नवोदित कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात तुम्ही रमाल.

तूळ ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकवणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी आज सहकुटुंब एखाद्या सहलीचे आयोजन करतील.

वृश्चिक (शुभ रंग – चंदेरी)
शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा आईच्या आज्ञेत रहा.

धनु (शुभ रंग- सोनेरी)
एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. विवाहेच्छुकांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. अतिउत्साहाच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. पत्नीने दिलेले सल्ले योग्यच असतील.

मकर (शुभ रंग – मरून)
वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षित रित्या वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती करावी लागेल.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)
आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त खरेदी कराल आज संध्याकाळी हरवलेले सापडेल.

मीन (शुभ रंग – केशरी)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असल्याने कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे जिवलग मित्र तुमच्या शब्दास मान देतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ संभवतो

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Bhosari News: अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.