Today’s Horoscope 17 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 17 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 17. 05.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 10.30  ते  12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 21.18 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————————–

मेष ( शुभ रंग- निळा)

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. हातचे सोडून पळत्या मागे धावण्याचा मोह होईल. तरुणांना आज प्रलोभाने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)

आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटण्याजोगी कामगिरी कराल. आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आज मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

मिथुन (शुभ रंग – पांढरा)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

कर्क ( शुभ रंग- गुलाबी)

आर्थिक बाजू भक्कम असल्याने सर्व कामे सुरळीत पार पडतील. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव पडेल. गृहिणी आज जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील.

सिंह ( शुभ रंग- सोनेरी)

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल. इतरांना दिलेले शब्द तुम्ही आज आवर्जून पाळाल.

कन्या (शुभ रंग- जांभळा)

आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. प्रवास कार्य साधक होतील. आज कंजूषणा न करता काही अनावश्यक खर्च करावेच लागणार आहेत.

तूळ (शुभ रंग- आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्कीच लाभेल.

वृश्चिक ( शुभ रंग-मोरपंखी)

आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज तुम्ही व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

धनु (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ 100% असेल. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळी ही आज गरजेपूर्ती श्रद्धाळू होणार आहेत.

मकर (शुभ रंग- मरून)

जे चाललंय ते बरच म्हणायला हवं. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह धरू नका. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. आज सासुरवाडी कडून तुम्हाला एखादा लाभ होऊ शकतो.

कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)

वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात मध्यस्थी कराल.

मीन (शुभ रंग- क्रीम)

तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जोपासतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृह सौख्याचा दिवस.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.