Today’s Horoscope 17 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार… मंगळवार, ….. ​दि​. 17 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार – 12 नंतर चांगला.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
  • दिशा शूल –  उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र –  12.21 पर्यंत ज्येष्ठा नंतर मूळ.
  • चंद्र राशी – वृश्चिक 12.21 पर्यंत नंतर धनु.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – लाल)
आज कुठलीही गोष्ट सहज साध्य होणार नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ नक्की लाभेल. वैवाहिक जीवनात शब्दांचा वापर कमीच  करा.

वृषभ – (शुभ रंग – पिस्ता)
आज कारण नसताना दुसऱ्याच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. आज पत्नीला दिलेली वचने पाळाल.

मिथुन – (शुभ रंग – क्रीम)
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळे ही दूर झाल्याचे जाणवेल. तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.

कर्क –  (शुभ रंग – चंदेरी)
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही जणांचा आज गूढ शास्त्राकडे कल वाढेल. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
काही मनाजोगत्या घटनांनी तुमचे मनोबल वाढेल. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. इतरांना आज मदत करू शकाल. सासूबाईंनी केलेल्या कौतुकाने गृहिणी धन्य होतील.

कन्या  (शुभ रंग – हिरवा)
आज तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात कुणाला शब्द दिले असतील तर ते पाळावे लागतील. आज जरा मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस करा.

तूळ  – (शुभ रंग – जांभळा)
आर्थिक स्थिती आज उत्तम असून तुमचे मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. आज संध्याकाळी सहकुटुंब चैन करणार आहात. अति सडेतोड बोलणे टाळा,  त्यामुळे नाती दुरावतील.

वृश्चिक – (शुभ रंग – मरून)
आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. आज तुमचे मन काहीसे चंचल असेल. एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल.

धनु  (शुभ रंग- भगवा)
जमाखर्चाची तोंड मिळवणी करणे आज जरासे अवघड जाईल. गृहिणींना पूर्वी केलेली बचत कामी येईल. प्रवास होतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

मकर – (शुभ रंग – निळा)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहिल. नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील.

कुंभ – (शुभ रंग – आकाशी)
आज तुम्ही अतिउत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. अधिकारांचा योग्य वापर करण्याची वेळ येणार आहे. भिडस्तपणा नको.

मीन – (शुभ रंग – मोतीया)
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. वादविवादात आज तटस्थ रहा. थोडे अध्यात्माकडे वळणे हिताचे राहील.

( MPC News च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा 🙏)
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.