Today’s Horoscope 17 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार…. शनिवार… 17 ऑक्टोबर 2020

  • शुभाशुभ विचार –चांगला दिवस
  • आज विशेष – घटस्थापना. नवरात्रारंभ.
  • राहू काळ – दुपारी 09.00 ते 10.30
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – चित्रा 11.52 पर्यंत नंतर स्वाती.
  • चंद्र राशी – तुळ

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – तांबडा)

धंद्यातील आवक-जावक समान राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. कार्यक्षेत्रात समोर येणारी नवीन आव्हाने आनंदाने स्वीकाराल.

वृषभ – ( शुभ रंग- निळा )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या शाबासकीस बळी जाऊ नका. हाताखालच्या लोकांचीही सलोख्याचे संबंध गरजेचे आहेत. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.

मिथुन – (शुभ रंग – चंदेरी )

विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आपला बडेजाव दाखवण्यासाठी खर्च कराल. आज संध्याकाळी सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या आस्वाद घ्याल.

कर्क – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

दैनंदिन कामाचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काही तरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. महिलांना जोडधंद्यातून चांगली कमाई होईल.

सिंह – (शुभ रंग – पांढरा)

अथक परिश्रम यांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील.  नवीन झालेल्या ओळखीत स्वतःचे हित साधून घ्याल. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास प्राधान्य देतील.

कन्या – (शुभ रंग- जांभळा)

मिळकत पुरेशी असली तरीही आज बचतीला प्राधान्य देणे हिताचे राहील. गृहिणी आज सांसारिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पडतील. आनंदी दिवस.

तूळ – (शुभ रंग – पिस्ता)

घराबाहेर वावरताना आपला रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कुणी शेरास सव्वाशेर भेटू शकतो. दानधर्म करताना स्वतःची शिल्लक आधी तपासा.


वृश्चिक
 – (शुभ रंग- भगवा)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गास कामगारांचे प्रश्‍न सोडवावे लागतील. महत्वाच्या चर्चा व बैठकी उद्यावर ढकला.

धनु – (शुभ रंग- राखाडी)

आज तुमची मोठ्या लोकांमधील ऊठबस फायदेशीर राहील विवाहेच्छुकांना अनुरूप स्थळांचे प्रस्ताव येतील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ होऊ शकतो.

मकर – (शुभ रंग- आकाशी)

हौस करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. वाहतुकीचे नियम मोडले तर दंड चुकणार नाही. आपल्या प्रतिष्ठेस जपा. आज कायद्यात राहिलात तरच फायद्यात राहाल.


कुंभ
– (शुभ रंग -केशरी )

आज काही अयोग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. आज एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळेल.

मीन – (शुभ रंग – तांबडा )

व्यवसायात महत्त्वाचे करार मदार यशस्वी होतील. वैवाहिक जीवनात दोघांत एकमत राहील. आनंदी दिवस असून तुमचे प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.

 

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.