Today’s Horoscope 17 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, गुरुवार, दिनांक…17 सप्टेंबर 2020

  •  शुभाशुभ…अनिष्ट दिवस.
  • आज विशेष .. सर्वपित्री अमावस्या.
  • राहूकाळ…दुपारी 01. 30 ते 03.00.
  • दिशा शूल…दक्षिणेस असेल.
  • नक्षत्र… पूर्वा सकाळी 9.48 पर्यंत नंतर उत्तरा.
  • आजची चंद्र राशी…सिंह 15.07 पर्यंत नंतर कन्या.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – सोनेरी)
महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या, नंतर थोडा शारीरिक थकवा जाणवेल. आज तब्येतीची विशेष काळजी घ्या. रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.


वृषभ – (शुभ रंग – पांढरा)
घरात शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. नवोदित कलाकार व खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील.

 

मिथुन – (शुभ रंग – चंदेरी)
खर्च कितीही वाढला असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल.

 

कर्क – (शुभ रंग – मोरपंखी)
आज तुम्हाला घर दुरुस्तीच्या कामात लक्ष घालावे लागेल. कदाचित आज वाहनही रस्त्यात रुसून बसण्याची शक्यता आहे. शेजारी आज जरा तिरकस नजरेने बघतील.

 

सिंह – (शुभ रंग – हिरवा)
आज जरा हट्टीपणा बाजूला ठेवून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची मानसिकता ठेवा. कोणतेही निर्णय उतावळेपणाने घेणे योग्य ठरणार नाही. डोळ्यांची काळजी घ्या.

 

कन्या – (शुभ रंग – आकाशी)
थोड्याफार आर्थिक अडचणी असतील पण काळजी करू नका आज दुपारनंतर अचानकपणे काही रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. वाद विवादात आपल्या मतावर ठाम राहाल.

 

तूळ – (शुभ रंग – जांभळा)
आज कंजूषपणा काही कामाचा नाही अत्यावश्यक खर्च तुम्हाला करावाच लागणार आहे काही कर्जाचे हप्तेही फेडावे लागतील. प्रवास कार्यसाधक होतील.

 

वृश्चिक – (शुभ रंग – राखाडी)
आज पैशाअभावी रखडलेले जुने उपक्रम सुरू करता येतील. गरजूंना आपण होऊन मदत कराल. आज विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.

 

धनु – (शुभ रंग – भगवा)
नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावरच ढकललेली बरी. शासकीय कामे रखडणार आहेत. मित्र आश्वासने पाळणार नाहीत. आज देव मात्र तुमच्या नवसाला पावेल.

 

मकर – (शुभ रंग – तांबडा)
नवीनच झालेल्या ओळखीत कोणतेही व्यवहार करताना सावध राहायला हवे. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील. गृहिणींचा आज देवधर्माकडे ओढा असेल.

 

कुंभ – (शुभ रंग – डाळिंबी)
आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून मृगजळामागे धावू नका व कायद्याची चौकट अजिबात मोडू नका. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस.

 

मीन – (शुभ रंग – मोतिया)
दैनंदिन कामात काही अडथळे येतील. आपल्या कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका. वैवाहिक जीवनातील सौम्य मतभेद दुपारनंतर निवळतील

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.