Today’s Horoscope 18 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  गुरुवार, ​दि​. 18 फेब्रुवारी 2021

 

  • वार – गुरुवार.
  • शुभाशुभ विचार — चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस
  • राहू काळ – दुपारी 01.30  ते 03.00
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – भरणी.
  • चंद्र राशी – मेष.

 

 

आजचे राशीभविष्य

मेष –  ( शुभरंग – स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही स्वतःच्या प्रेमात राहाल. चैन करण्यासाठी मनसोक्त पैसा खर्च कराल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. जोडीदारास आज एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. ज्येष्ठांनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. आज फक्त आपला स्वार्थ बघा परमार्थ उद्यावर ढकला.

मिथुन – (शुभ रंग- मरून)

मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील  मनासारखा खर्च कराल. व्यवसायात तुम्ही घेतलेले निर्णय अचुक ठरतील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

कर्क – (शुभ रंग – हिरवा)

आज तुम्ही फारच हट्टीपणाने वागाल. अधिकाराचा गैरवापर महागात पडेल. कामात क्षुल्लक चुका करून विरोधकांना आयती संधी देऊ नका. कार्यक्षेत्रात काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने सोडवावे लागतील.

सिंह – (शुभ रंग- पिस्ता)

नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे. उच्चशिक्षित असाल तर विदेश गमनाची स्वप्ने साकार होतील. भक्तीमार्गात असणाऱ्या ज्येष्ठ मंडळींना सद्गुरु कृपेचा लाभ होईल.

कन्या –  ( शुभ रंग – लाल )

आज कंटाळवाणा दिवस असून क्षुल्लक कामातही अडचणी येतील. मोठ्या आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. वाहन चालवताना आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी.

तूळ – (शुभ रंग – मोरपंखी)

व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस. दुकानात गिर्‍हाईकांची वर्दळ वाढणार आहे. वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या आठवणी मनास आनंद देतील.

वृश्चिक – (शुभ रंग – क्रीम)

नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम कराल. काही जुन्या चुका निस्तराव्या लागतील. आज मोठ्या आर्थिक उलाढाली टाळा. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला अजिबात शब्द देऊ नका, तो पाळता येणार नाही.

धनु – ( शुभ रंग – जांभळा)

कौटुंबिक वातावरण  खेळीमेळीचे राहील. आज मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यांचे लाडही पुरवावे लागतील. कलाकारांना रसिक मंडळी डोक्यावर घेतील.

मकर – ( शुभ रंग- केशरी)

आज गृहसौख्याचा दिवस आहे. दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. स्थावर इस्टेटी विषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. आज प्रेम प्रकरणे मात्र फक्त मनस्तापच देतील.

कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)

नवा मित्रपरिवार वाढेल कामानिमित्त जवळपासच्या प्रवासाचे योग आहेत. काही नवीन ओळखी होतील. शेजाऱ्यांशी जवळीक निर्माण होईल. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क रहा.

मीन – ( शुभ रंग- चंदेरी)

अत्यंत उत्साहवर्धक दिवस असून व्यवसायिक उलाढाल वाढेल. विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. आज मी म्हणेन तीच पूर्व असे तुमचे धोरण असेल. जागे संबंधित काही महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.