Today’s Horoscope 18 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार सोमवार. …. ​दि​.  18 जानेवारी 2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा ०७.४३ पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.
  • चंद्र राशी –  मीन.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – राखाडी)
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील, हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल, पण तसे न करणे हिताचे राहील. कौटुंबिक निर्णय थोरांच्या संगनमताने घ्यावे लागतील.

वृषभ – (शुभ रंग- मरून)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल वैवाहिक जीवन सौख्यपूर्ण असून आरोग्यही उत्तम साथ देईल. इच्छा पूर्तीचा दिवस दिवस.

मिथुन – ( शुभ रंग – सोनेरी)
आज फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. बेकायदेशीर कृत्य अंगाशी येऊ शकतात. आज मित्रांच्या फार नादी लागू नका, फक्त स्वतःच्याच भल्याचा विचार करा.

कर्क – (शुभ रंग – चंदेरी)
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमी असेल. काही कामे आज निस्वार्थीपणे करावी लागणार आहेत. दानधर्म करताना आपली मिळकत ही विचारात घेणे गरजेचे.

सिंह – (शुभ रंग – गुलाबी)
कसलेही नवे उपक्रम सुरू करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. आज कष्टांचा हि अतिरेक टाळा. विवाह जुळवण्या विषयी चर्चा आज नकोतच. गाडी जपून चालवा

कन्या – ( शुभ रंग – आकाशी)
व्यवसायिक उलाढाल वाढेल. नवे परिचय व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

तूळ – (शुभ रंग- सोनेरी)
अधिकारी वर्गाला हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितली तर वसूल होण्याची शक्यता आहे. आज खेळाडूंचा स्पर्धेतील विजय नक्की

वृश्चिक – ( शुभ रंग- आकाशी)
मित्रांमध्ये केवळ मोठेपणा घेण्यासाठी काही न परवडणारा खर्च आज आपण कराल. सौंदर्यप्रसाधने व चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय आज तेजीत चालतील. गृहणी पार्लर साठी वेळ देतील.

धनु – (शुभ रंग भगवा)
प्रॉपर्टी विषयी काही कामे रखडलेली असतील तर अशा कामांना चालना मिळेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. गृहिणींना मुलांच्या अभ्यासात डोकवावे लागणार आहे.

मकर – ( शुभ रंग- पिस्ता)
अधिकारी वर्गाने कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. कोर्ट प्रकरणे कोर्टाबाहेर निपटून टाकणे हिताचे राहील. विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून बाकी सर्व काही सुचेल.

कुंभ –  (शुभ रंग – मोरपंखी)
आज तुम्हाला विविध मार्गांनी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचुक ठरतील. ज्योतिषी असाल तर तुम्ही केलेली भाकीते खरी ठरतील. आशादायी दिवस.

मीन – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी)
आज भावना व कर्तव्य यात तुमच्या मनाची ओढाताण होईल. काही साधे निर्णय घ्यायला ही तुम्हाला बराच वेळ लागेल. पत्नी म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे व्हा.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.