Todays Horoscope 18 January 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार मंगळवार, दि. 18.01.2022

  • शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
  • आज विशेष- साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुष्य.
  • चंद्र राशी –  कर्क.

_______________________

आजचे राशीभविष्य-

मेष- (शुभ रंग- मोतिया)

आज कौटुंबिक जीवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. प्रेम प्रकरणे मात्र मनस्ताप देतील. जमीन जुमला खरेदी विक्रीचे व्यवहार नफा मिळवून देतील. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.

वृषभ – ( शुभ रंग- तांबडा)

आज भावा भावात सामंजस्य राहील. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार मिळेल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. घराबाहेर वादविवाद टाळावेत.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रातील तुम्ही पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल. यश आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. गृहिणी आल्या गेल्याचा पाहुणचार अगत्याने करतील.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)

आवक पुरेशी असली तरी आज बचतीला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. आज व्यापाऱ्यां साठी उत्तम दिवस आहे. थकलेली उधारी वसूल होऊ शकेल. वाडीत गोडवा ठेवाल तर अशक्य कामे शक्य होतील.

सिंह- ( शुभ रंग- हिरवा)

आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. विजा पासपोर्ट संबंधी कामे यशस्वी होतील. घरा बाहेर वावरताना क्रोधावर लगाम ठेवणे गरजेचे आहे. ज्येष्ठांचा अध्यात्माकडे ओढा वाढेल.

कन्या- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाहविषयक बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ पदरी पडणार आहे.

तुळ – ( शुभ रंग -आकाशी)

आज नोकरीच्या ठिकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाही. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे राहील. मित्रांना आज दुरूनच राम राम करा. स्पष्टवक्तेपणा ने काही नाती दुरावतील.

वृश्चिक -( शुभ रंग – जांभळा)

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. कोणावरही विसंबून राहू नका, स्वावलंबन महत्त्वाचे राहील. आज महत्त्वपूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या.

धनु – ( शुभ रंग- निळा)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस. ड्रायव्हिंग काळजीपूर्वक करा.

मकर – ( शुभ रंग – चंदेरी)

दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. नोकरदार मंडळी वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहिक जीवनात तू तिथे मी असे वातावरण असेल. छान दिवस.

कुंभ -( शुभ रंग -गुलाबी)

काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी आज गोड बोलून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यावा. ज्येष्ठ मंडळींना डॉक्टरांच्या भेटीचा योग अटळ आहे.

मीन – ( शुभ रंग- भगवा)

चैनी व विलासी वृत्ती बळावेल. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल. उच्चशिक्षित तरुणांच्या अपेक्षा वाढतील. आज सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालणार आहेत.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.