Today’s Horoscope 18 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

18.03.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस

आज विशेष- पापमोचनी एकादशी.

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- श्रवण.

चंद्र राशी – मकर.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- जांभळा )

मित्रमंडळींना दुरूनच राम राम करून आज तुम्ही आपल्या ध्येयप्राप्ती प्राधान्य द्याल कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिद्ध कराल तुमचे विरोधकही तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील.

वृषभ (शुभ रंग- निळा )

आज महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्यावे अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत ठरू शकते. आज कायद्याची चौकट मोडणे ही महागात पडू शकेल. नाकासमोर चालणे हिताचे.

मिथुन ( शुभ रंग- तांबडा )

कमी कष्टात जास्त मोबदला मिळावा अशी अपेक्षा करून चालणार नाही. विश्वासू मित्रांकडूनही दगा फटका होऊ शकतो. सतर्क रहा आज गाडी चालवताना वेगावर ताबा ठेवा.

कर्क (शुभ रंग- पिस्ता.)

नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण कितीही वाढला तरीही तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य राहील. घरात जोडीदाराकडूनही तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

सिंह (शुभ रंग- लाल )

नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. काही आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आज तुम्ही कोणालाही न मागता सल्ले देऊ नका.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेळ. कमी श्रमात जास्त लाभाची स्वप्ने पहाल. आज तुम्ही हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क करण्यास प्राधान्य द्याल सामान्य दिवस.

तूळ ( शुभ रंग- मोतिया)

बरेच दिवसापासून रेंगाळलेल्या घरगुती कामात आज लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत चांगली असेल. मुले अभ्यासात मन एकाग्र करतील.

वृश्चिक (शुभ रंग- डाळिंबी)

आज प्रत्यक्ष कृतीपेक्षा रिकामटेकड्या गप्पा तुमचा बराच वेळ फुकट जाईल सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या कामे येतील आज शेजारी आपलेपणाने डोकावतील.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने मुलांचे हट्ट तुम्ही हौसेने पुरवाल. अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठबस गृहिणी अगत्याने करतील. आज मोजकेच बोलणे प्रभावी राहील.

मकर ( शुभ रंग- गुलाबी )

आज तुम्ही स्वतःच्याच प्रेमात रहाल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा अट्टहास राहील. तरी महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय अनुभवींच्या सल्ल्यानेच घ्या.

कुंभ (शुभ रंग – पांढरा )

कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमा खर्चाची गणिते बिघडतील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल प्रवास होतील.

मीन -(शुभ रंग – भगवा )

आज लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण करेल. मुला-मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज शुभच चिंता म्हणजे शुभच होईल. वाणीत गोडवा हिताचा राहील.

शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.