Today’s Horoscope 18 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – मंगळवार, दि. 18 मे  2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – गापूजन – गांगोत्पत्ती
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
  • दिशा शूल –  उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – 14.55 पर्यंत पुष्य नंतर अश्लेषा.
  • चंद्र राशी – कर्क.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – मरून)
आज तुमचा फक्त ऐश आराम करण्याकडे कल राहील. संध्याकाळी एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. सहकुटुंब चैन करून बच्चे कंपनीस खुश कराल.

.

वृषभ – (शुभ रंग – पिस्ता)
भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. अथक मेहनतीच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरूच राहिल. आज एका महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

मिथुन – (शुभ रंग – पांढरा)
आज आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल.

कर्क – (शुभ रंग – राखाडी)
कार्यक्षेत्रात विरोधकांचा विरोध मावळेल. योग्य हितसंबंध निर्माण होतील. खर्चास आवर घालून पुरेशी बचत करता येईल. आज अति आक्रमकतेने कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

सिंह – (शुभ रंग – भगवा)
आज तुम्ही महत्वाच्या चर्चेत अग्रेसर असाल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुती नेही भारावून जाल. काही फसव्या संधी चालून येतील हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे हिताचे नाही.

कन्या – (शुभ रंग – हिरवा)
आज तुम्ही आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू आहे. तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत.

तूळ – (शुभ रंग – पांढरा)
नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. अर्धवट बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरु करता येतील. उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेगवान राहील. आत्मविश्‍वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

वृश्चिक – (शुभ रंग – नारिंगी)
आज तुम्हाला महत्त्वाकांक्षी व्यक्तींचा सहवास लाभेल. ध्येयपूर्तीकडे वेगाने वाटचाल होईल. कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल.

धनु – (शुभ रंग – आकाशी)
कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीला नशिबाची उत्तम साथ मिळेल.

मकर – (शुभ रंग – मोरपंखी)
आज तुम्ही इतरांच्या भानगडीत नाक खुपसाल. एखादा विवाह जुळण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. आज तुम्हाला पत्नीस दिलेली वचनही पाळावी लागणार आहेत. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)
व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. जीवलग मित्रांमध्ये ही आज काही वैचारिक मतभेद होतील. जोडीदाराकडून आज फार अपेक्षा नकोत.

मीन – (शुभ रंग – पिस्ता)
कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.