Today’s Horoscope 18 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार… बुधवार, ….. ​दि​. 18 नोव्हेंबर 2020

 

  • शुभाशुभ विचार- १२ पर्यंत चांगला.
  • आज विशेष — विनायक चतुर्थी.
  • राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र –  मूळ १०.४० पर्यंत.  नंतर पूर्वाषाढा.
  • चंद्र राशी –  धनु.

 

आजचे राशीभविष्य

मेष( शुभ रंग- पिस्ता)

आज कोणत्याही नव्या उपक्रमाची सुरुवात टाळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल, काही सज्जनांचा सहवास लाभेल. विचार प्रगल्भ होतील.

वृषभ –  ( शुभ रंग- लाल)

सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात अशी अपेक्षा करू नका. आज काही पूर्वीच्या चुका निस्तरव्या लागणार आहेत. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत.

मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)

आपल्या अती सडेतोड बोलण्याने कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमध्ये न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

कर्क –  (शुभ रंग- क्रीम)

कुणाकडून येणी असतील तर ती मागायला लाजू नका. पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे होणे हिताचे आहे. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज भासेल.

सिंह –  ( शुभ रंग- हिरवा)

उच्चशिक्षित असाल तर लठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. प्रतिष्ठितांच्या ओळखीतून आपला स्वार्थ साधून घेता येईल. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल.

कन्या

( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कष्टांचा हि अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण हे लक्षात असू द्या. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क कसे करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

तूळ  – (शुभ रंग – मरून)

घर दुरुस्तीच्या काही किरकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. घर खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे. शेजारी आज आपलेपणाने डोकावतील.

वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा)

व्यावसायिक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्याच मतावर अडून बसाल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

धनु (शुभ रंग – निळा)

आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका. एखादी गहाळ झालेली वस्तू आज अचानक सापडेल.

मकर –  ( शुभ रंग- भगवा)

बेरोजगारांनी रोजगारासाठी घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवायला हवी.  आज खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. ज्येष्ठांनी गाठीशी असलेली पुंजी जपून वापरावी.

कुंभ ( शुभ रंग- मोतिया)

आज तुमसे मनोबल उत्तम असून काही मनासारख्या घटना घडतील. दैनंदिन व्यवहार विनाव्यत्यय पार पडतील. वास्तू किंवा वाहन खरेदीचे व्यवहार मार्गी लागतील.

मीन – (शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक घटना घडतील. नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल. ऑफिस कामाच्या व्यापात कौटुंबिक गरजा दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.
( MPC News च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा 🙏)
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.