Today’s Horoscope 18 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार….  रविवार … 18 ऑक्टोबर 2020

  • शुभाशुभ विचार — ०९ पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष –  साधारण दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी ०४.३० ते ०६.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र -स्वाती ०८.५१ पर्यंत नंतर विशाखा.
  • चंद्र राशी – तुळ

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- निळा )

कार्यक्षेत्र स्वतःचे वर्चस्व सिद्ध कराल. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे तुमचे दुर्लक्ष होईल. आज पत्नीने दिलेले सल्ले फारच उपयुक्त ठरणार आहेत.

वृषभ – (शुभ रंग – मोरपिशी )

रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी, अन्यथा एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

मिथुन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

घरात आधुनिक सुख सुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर अनेक संधी चालून येतील. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल.

कर्क ( शुभ रंग – चंदेरी )

सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आज गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मुलांचे हट्ट स्वखुशीने पुरवाल.

सिंह – ( शुभ रंग- जांभळा )

तुमच्या एखाद्या नकळत झालेल्या चुकीमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामातही काही अडथळे संभवतात.
गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील.

कन्या – (शुभ रंग- पांढरा )

आज रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवणे हिताचे. प्रवासात खूपच दगदग होईल.

तूळ – ( शुभ रंग- भगवा )

आज वादविवादात तटस्थ राहा. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील. वैवाहिक जीवनात जुन्या स्मृतींना उजाळा द्याल.


वृश्चिक
 -( शुभरंग- पिस्ता )

आज टेलिफोन व लाईट बिले भरावे लागतील. काही अत्यावश्यक देणीही चुकवावी लागतील. हौस मौज करण्यावर थोडी मर्यादा येईल. काहीजण दूरच्या प्रवासाचा आनंद घेता घेतील.

धनु – ( शुभ रंग – आकाशी )

वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. संततीकडून सुवार्ता येतील. जिवलग मित्र आज हिताचेच सल्ले देतील. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीतून लाभ पदरी पडेल.

.

मकर – ( शुभ रंग- राखाडी )

कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. नेतेमंडळी अधिकारांचा योग्य वापर करतील.

कुंभ – (शुभ रंग- तांबडा )

नवीन उपक्रमांची सुरुवात उद्याच केलेली बरी. गृहिणींचा आज    देवधर्माकडे ओढा असेल व देवही आज नवसास पावेल. अधिकारी वर्गाने अधिकारां पेक्षा कर्तव्याचा विचार केलेला बरा.

मीन – ( शुभ रंग – केशरी )

नव्यानेच   झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करू नका. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. वाहन चालवताना इतर काही विचार करू नका.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.