Today’s Horoscope 18 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, शुक्रवार, दिनांक…18 सप्टेंबर 2020

  •  शुभाशुभ…उत्तम दिवस.
  • आज विशेष ..  अधिक मासारंभ.
  • राहूकाळ…दुपारी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल…पश्चिमेस असेल.
  • नक्षत्र… उत्तरा सकाळी 07.00 पर्यंत नंतर हस्त नक्षत्र.
  • आजची चंद्र राशी…कन्या.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग -लाल)
कार्यक्षेत्रात महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर केवळ स्वप्नरंजनापेक्षा अविश्रांत परिश्रम गरजेचे आहेत. तुमची काही येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.


वृषभ – (शुभ रंग – गुलाबी)
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील  लहान-मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा उपद्रव कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

 

मिथुन – (शुभ रंग- हिरवा)
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना घडतील. मुले आज्ञाधारकपणे वागतील. प्रेमवीरांनी मात्र आज तू नही तो और सही हेच धोरण ठेवावे.

 

कर्क – (शुभ रंग- जांभळा)
आज संमिश्र फळे देणारा दिवस असून आवक-जावक समान राहणार आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त पायपीट होईल. आज तुमचा शेजारी सलोखा वाढेल.

 

सिंह – (शुभ रंग-आकाशी)
आज तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. आज शब्द हे शस्त्र आहे याचे मात्र भान ठेवा. गृहिणी पाहुण्यांची ऊठबस आनंदाने करतील.

 

कन्या – (शुभ रंग – निळा)
तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. आज दुपारनंतर एखादी चांगली बातमी येईल. आज जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवाल.

 

तूळ – (शुभ रंग- सोनेरी)
आपले बोलणे इतरांना पटेलच असा अट्टाहास करू नका. कुणीही विचारल्याशिवाय सल्ले वाटप करू नका. आवाक्‍याबाहेर जाणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

 

वृश्चिक – (शुभ रंग- पिवळा)
कौटुंबिक वाद असतील तर आज ते सामंजस्याने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. काही भाग्यवंतांची वाहनखरेदीचे स्वप्ने साकार होतील.

 

धनु – (शुभ रंग – तांबडा)
नोकरीच्या ठिकाणी साहेबांचे मूड सांभाळावे लागणार आहेत. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. काही मित्रही दगा देतील, सतर्क राहा. आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील.

 

मकर – (शुभ रंग -केशरी)
उद्योग-व्यवसायात तुम्हाला पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. आपल्या कर्तुत्वास थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना एखादी प्रचिती येईल.

 

कुंभ –  (शुभ रंग- नारिंगी)
काही क्षुल्लक गोष्टींनी ही आज राग अनावर होईल. आपलेच खरे न करता थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. केवळ मोठेपणासाठी न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका.

 

मीन – (शुभ रंग – क्रीम)
व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. तुमच्या कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. आज विवाह विषयक चर्चा सकारात्मकतेने पार पडतील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.