Today’s Horoscope 18 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – शनिवार, दि. 18 सप्टेंबर 2021.

  • शुभाशुभ विचार – क्षयदिन.
  • आज विशेष – शानिप्रदोष
  • राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – धनिष्ठा.
  • चंद्र राशी – मकर 15.26 पर्यंत नंतर कुंभ.

—————————————

आजचे राशीभविष्य –

मेष –  ( शुभ रंग- डाळिंबी)

व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. एखाद्या रखडलेल्या मोठ्या रकमेची वसुली होऊ शकेल.

वृषभ – (शुभ रंग- राखाडी)

नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अडचणी आज देवालाच सांगितलेल्या बऱ्या.

मिथुन – (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज काही गोड बोली माणसे भेटतील झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील. आज कामापुरतेच बोला.

कर्क – ( शुभ रंग – सोनेरी)

आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. इतरांना योग्य सल्ले द्याल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. महत्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल. आनंदी दिवस.

सिंह- ( शुभ रंग- पांढरा ) 

आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्या करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. वैवाहिक जीवनात दुपारनंतर एकमत राहील.

कन्या- (शुभ रंग – गुलाबी)

चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. पैसा उडवायचे अनेक मार्ग सुचतील. आज आरोग्य उत्तम राहील.

तूळ – (शुभ रंग – मोरपिशी )

कुटुंबात आज आर्थिक सुबत्ता नांदेल. गृहिणी घर सजावटीवर खर्च करतील. भावनेच्या भरात घेतलेले  निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे. आज प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.

वृश्चिक-( शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल काही जुनी तत्त्वही गुंडाळून ठेवावी लागणार आहेत. आज भाडेकरूंचे घर मालकांशी मतभेद होतील. शेजारी आपलेपणाने डोकावतील.

धनु – ( शुभ रंग- नारिंगी)

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. वक्त्यांची भाषणे आज प्रभावी होतील. शेजारी आज कुत्सित नजरेने बघतील. आज संध्याकाळी एखाद्या घरगुती कार्यक्रमास हजेरी लावाल.

मकर – ( शुभ रंग- जांभळा)

अति धावपळ टाळा. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट  करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येणार आहे त्याचा वेळीच फायदा घ्या. निर्णय घेण्यास विलंब लावू नका.

कुंभ – ( शुभ रंग -चंदेरी)

कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. आज कोणतीही रिस्क घेऊ नका. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे.

मीन – ( शुभ रंग- मरून )

वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४.

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.