Today’s Horoscope 19 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 19 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार

तारीख – 19.04.2024.

शुभाशुभ विचार – भद्रा वर्ज्य.

आज विशेष – कामदा एकादशी.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00. 

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – मघा 10.57 पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————————–

मेष ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय तेजीत चालतील. संध्याकाळी प्रिय मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते मार्गी लागतील. प्रेमी युगुलांमध्ये वादविवाद संभवतात.

मिथुन (शुभ रंग – पांढरा)

आज काम कमी व दगदगच जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होऊ शकते. रिकामटेकडी चर्चा फक्त वादाला कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात जुळलेले नवे हितसंबंध भविष्यकाळाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

सिंह ( शुभ रंग- मोरपिशी)

किरकोळ कारणांवरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून स्वार्थ साधून घ्या. आवक पुरेशी असली तरीही आज बचतीला प्राधान्य देणे गरजेचे राहील.

कन्या (शुभ रंग- जांभळा)

तुमची तब्येत थोडीशी नरमच असेल. एखादी किरकोळ गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. जशास तसे या धोरणाने वागा. मोफत सल्लागार मंडळींचे सल्ले फार मनावर घेऊ नका.

तूळ (शुभ रंग- निळा)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करू शकाल.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल. हाताखालचे लोक तुमच्याशी आदबीने वागतील.

धनु (शुभ रंग- गुलाबी)

घरात आज थोर मंडळींशी थोडेफार वैचारिक मतभेद होऊ शकतात. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आज थोडी भटकंती होईल. पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील.

मकर (शुभ रंग- हिरवा)

आज दिवसाचा पूर्वार्ध मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी तितकासा अनुकूल नाही. दुपारनंतर कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. घरात वडीलधाऱ्यांची मने जपावी लागतील.

कुंभ ( शुभ रंग- मोतिया)

महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. दुपारनंतर दिवस तितकासा अनुकूल नाही. नवीन ओळखीत फक्त रामराम करा. कोणताही व्यवहार नको.

मीन (शुभ रंग- राखाडी)

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगली जमेल. वैवाहिक जीवनात आज दुपारनंतर सुसंवाद घडेल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.