Today’s Horoscope 19 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  शनिवार . ….. ​दि​.  19 डिसेंबर 2020

  • शुभाशुभ विचार — चांगला दिवस.
  • आज विशेष – नागपूजन- नागदिवे.
  • राहू काळ – सकाळी ०९.३० ते १०.३०.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – धनिष्ठा १९.४० पर्यंत नंतर शततारका.
  • चंद्र राशी – मकर ०७.१६ पर्यंत नंतर कुंभ.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग मोरपिशी)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. यशदायी दिवस.

वृषभ – ( शुभ रंग जांभळा )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. उद्योगधंद्यातील मोठ्या आर्थिक उलाढाली यशस्वी होतील.

मिथुन  ( शुभरंग- मरून )

काही क्षुल्लक कामातही अडचणींचे डोंगर उभे राहतील. नास्तिक मंडळी ही आज देवाला एखादा नवस बोलतील. ज्येष्ठांना आज उपासनेची प्रचिती येईल. आज तुम्हाला सज्जनांचा सहवास लाभेल.

कर्क( शुभ रंग- मोतिया )

आज तब्येत नरम असल्याने दिवस कंटाळवाणाच जाईल. आर्थिक अडचणींवर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पळवे लागतील. शत्रु कदाचित मित्रांमध्ये च लपले असतील. सतर्क राहा.

सिंह – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज कार्यक्षेत्रात नवी आव्हाने जिद्दीने स्वीकाराल. तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. वैवाहिक जीवनात मात्र आज सुसंवाद राहील.

कन्या ( शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्या. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे. आज जे काही करायचे असेल ते तब्येतीस जपूनच करा. दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होईल.

तूळ ( शुभ रंग- केशरी )

आज तुम्ही स्वतःच्या प्रेमात राहाल. चैन करण्यासाठी मनसोक्त पैसा खर्च कराल. आपल्या व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित कराल. गृहिणी सौंदर्याची काळजी घेतील.

वृश्चिक ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. आज आर्थिक आवक पुरेशी असून परिवारात सामंजस्याचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील. गृहणी शेजारधर्म जपतील.

धनु ( शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवणे कठीण होईल. गृहिणींना विविध जाहिराती आज भुरळ घालतील. विद्यार्थ्यांनी प्रयत्न वाढवावेत, यश तितकेसे सोपे नाही.

मकर – ( शुभ रंग- आकाशी )

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्याही महत्वाकांक्षा वाढतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आज इच्छापूर्ती चा दिवस.

कुंभ ( शुभ रंग- हिरवा )

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंगांना सहज तोंड द्याल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेताना भागीदारांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.

मीन  ( शुभ रंग- पांढरा)

ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपुन वापरावी. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल वाद-विवाद टाळलेले बरे.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.