Today’s Horoscope 19 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  शुक्रवार, ​दि​. 19 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार — भद्रा दिन.
  • आज विशेष – रथसप्तमी. भीम आष्टमी.
  • राहू काळ – सकाळी १०.३०  ते १२.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – कृत्तिका.
  • चंद्र राशी – ०९.४१ पर्यंत मेष नंतर वृषभ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्च वाढत असला तरीही पैसा कमी पडणार नाही. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील गृहलक्ष्मी आज प्रसन्ना असेल.

वृषभ – ( शुभ रंग- मरून)

आज तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. अतिशय स्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. आज कामापुरतेच बोला.

मिथुन – ( शुभ रंग- आकाशी)

आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकुन घेतलेली बरी. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे राहील. काही महत्त्वाची मेल्स येणार आहेत. काहींना दूरचे प्रवास घडतील.

कर्क – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज काही मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेटी व्यवसाय वृद्धि च्या कामी येतील. संध्याकाळी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल.

सिंह – ( शुभ रंग- मोरपंखी)

उद्योगधंद्यात स्पर्धा वाढलेली असेल. जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या बातम्या येतील. अधिकारात वृद्धि होईल. घरगुती कामे दुर्लक्षीत होतील.

कन्या – ( शुभ रंग- पिस्ता )

 घरातील वडीलधार्‍या मंडळींशी वाद-विवाद संभवतात. तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले जातील. नोकरदारांनी आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे, विरोधक टपूनच बसलेले आहेत.

तूळ – (शुभ रंग- क्रीम)

कार्यक्षेत्रात हितशत्रूंच्या उपद्रव वाढणार आहे, सतर्क रहा. महत्वाच्या चर्चा बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या. विवाह विषयक बोलणी आज अजिबात नकोत.

वृश्चिक – ( शुभ रंग – लाल)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा विरोध मावळेल. तुम्ही केलेले कष्ट कारणी लागतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असे छान वातावरण असेल.

धनु – ( शुभ रंग- केशरी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण जाणवेल. काही जुनी दुखणी डोके वर काढणार आहेत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही येणी असतील तर मागायला लाजू नका.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. गृहिणींना घर सजावटीच्या काही वस्तू आकर्षित करतील. आज एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ – (शुभ रंग- चंदेरी)

काही अति हुशार माणसे संपर्कात येतील. महत्त्वपूर्ण चर्चेत फक्त ऐकण्याचे काम करा. गृहिणींना आज सासुबाईं कडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतील.

मीन –  (शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. काही वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात रहा.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.