Today’s Horoscope 19 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार मंगळवार,  ​दि​.  19 जानेवारी 2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी ३.०० ते ४.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा ०९.५५ पर्यंत नंतर रेवती.
  • चंद्र राशी – मीन.

 

आजचे राशीभविष्य

_MPC_DIR_MPU_II

मेष – (शुभ रंग – राखाडी)

आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या. बरेच दिवसांनी काही दूरचे नातलग संपर्कात येतील. गृहिणींवर जबाबदार्‍या वाढतील.

वृषभ – (शुभ रंग – मरून)

योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल. आवक मनाजोगती असेल. काही दुरावलेल्या नातेसंबंधात सुधारणा होईल.

मिथुन – (शुभ रंग – सोनेरी)

आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर कृत्य अंगाशी येऊ शकतात. आज तुम्ही एखाद्या मित्राच्या मदतीस धावून जाणार आहात.

कर्क – (शुभ रंग – चंदेरी)

आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमी असेल. काही कामे आज निस्वार्थीपणे करावी लागणार आहेत. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. स्वतःवर संयम ठेवा.

सिंह – (शुभ रंग – गुलाबी)

कसलेही नवे उपक्रम सुरू करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. आज कष्टांचा हि अतिरेक टाळा. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा, विश्रांतीही गरजेची आहे.

कन्या – (शुभ रंग – आकाशी)

धंद्यात आवक-जावक सारखीच राहील. नवे परिचय व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

तूळ – (शुभ रंग – सोनेरी)

अधिकारी वर्गाला हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितली तर वसूल होण्याची शक्यता आहे. आज खेळाडूंचा स्पर्धेतील विजय नक्की.

वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)

मित्रांमध्ये केवळ मोठेपणा घेण्यासाठी काही न परवडणारा खर्च आज आपण कराल. मुलांच्या बाबतीत आज काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत.

धनु – (शुभ रंग – भगवा)

प्रॉपर्टीविषयी काही कामे रखडलेली असतील तर अशा कामांना चालना मिळेल. कौटुंबिक वाद असतील तर आज सुसंवादाने मिटू शकतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवणे गरजेचे आहे.

मकर – (शुभ रंग – पिस्ता)

अधिकारी वर्गाने कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. कोर्ट प्रकरणे कोर्टाबाहेर निपटून टाकणे हिताचे राहील. आज काही महत्त्वाचे मेल्स येणार आहेत. दुपारनंतर प्रवासास निघाल.

कुंभ – (शुभ रंग – मोरपंखी)

आज तुम्हाला विविध मार्गांनी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचुक ठरतील. तब्येत ठणठणीत राहील. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरणार आहेत.

मीन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

प्रभावी वक्तृत्वाने आज समोरच्यास प्रभावित कराल. महत्त्वाचे व्यावसायिक करार करण्यासाठी आज अतिशय योग्य दिवस. पत्नी म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे व्हा.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.