Today’s Horoscope 19 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार… गुरुवार , ….. ​दि​. 19 नोव्हेंबर 2020

 

  • शुभाशुभ विचार — चांगला दिवस.
  • आज विशेष – पांडव पंचमी.
  • राहू काळ – दुपारी १.३०  ते ३.००.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा ०९.३८ पर्यंत, नंतर उत्तराषाढा
  • चंद्र राशी – धनु १५.३० पर्यंत नंतर मकर.

 

आजचे राशीभविष्य

मेष –  (शुभ रंग – मोतिया)

नोकरीच्या ठिकाणी आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. गृहीणी दानधर्म करतील.

वृषभ –  ( शुभ रंग- सोनेरी )

आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील काही कामे आज निस्वार्थीपणे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की.

मिथुन ( शुभरंग – केशरी )

ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी झाकली मूठ झाकली ठेवणे गरजेचे आहे.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा )

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील, हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचां मोह होईल. भावनेच्या भरात कोणालाही कसलीही वचने देऊ नका. कुसंगतीने गोत्यात याल.

सिंह –  ( शुभ रंग – मरून )

आज तुमचा आत्मविश्‍वास वाढवणार्‍या काही घटना घडतील. एखादा जोडधंदा असेल तर त्यातून चांगली आवक होईल. चैनी वृत्तीस थोडा लगाम करणे गरजेचे राहील.

कन्या ( शुभ रंग- डाळिंबी )

आज काही दुरचे नातलग संपर्कात येणार आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट चे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. आज काही देणी द्यावी लागतील. विवाह विषयक चर्चा आज नकोत.

तूळ  – ( शुभ रंग – चंदेरी )

जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. मित्रच आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील.

वृश्चिक (शुभ रंग- आकाशी )

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रमोशन ची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. घरगुती कामे दुर्लक्षित होतील.

धनु –  (शुभ रंग- जांभळा )

हितशत्रू सक्रीय आहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज परिश्रमाने यश सोपे होईल दैवाची साथ तर आहेच. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी )

विरोधक सक्रिय असताना बिनचूक कामास प्राधान्य द्यावे लागेल. कोणाकडून कसली अपेक्षा करू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत

कुंभ –  (शुभ रंग- मोरपिशी)

घराबाहेर आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात जोडीने उपस्थित रहाल. आज जिवलग मित्रांनी दिलेले सल्ले नक्की विचारात घ्या.

मीन  ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

अती श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोट बिघडणार आहे.
( MPC News च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा 🙏)
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.