Today’s Horoscope 19 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार –  रविवार, दि. 19 सप्टेंबर 2021.

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – अनंत चतुर्दशी.
  • राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00.
  • दिशा शूल -पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – शततारका.
  • चंद्र राशी – कुंभ.
—————————————
आजचे राशीभविष्य – 

मेष – ( शुभ रंग- क्रीम)

आज दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत काही कारणाने दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. कार्यक्षेत्रात विरोधक मैत्रीचा हात पुढे करतील.

वृषभ- ( शुभ रंग- पिस्ता )

नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.

मिथुन- ( शुभ रंग- सोनेरी)

नोकरीत वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

कर्क –( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी शुल्लक मतभेद होणार आहेत पण त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल. फार ताणू नका.

सिंह – ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्ही सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल. वैवाहिक जीवनात एकमत राहील. भागीदारी व्यवसायात आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

कन्या – ( शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचे योग आहेत. ज्येष्ठ मंडळांनी प्रकृतीची पथ्ये पाळावीत. खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.

तुळ – ( शुभ रंग – भगवा)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरीत बदल करायचा असेल तर चांगल्या संधी चालून येणार आहेत. ब्युटी पार्लर्स व सौंदर्य प्रसाधने इत्यादी व्यवसाय तेजीत चालतील.

वृश्चिक ( शुभ रंग- मोरपिशी)

आज धंद्यातील आवक-जावक सारखीच राहील. जोडीदाराकडून आज तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण स्नेहपूर्ण राहील. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता होईल.

धनु- ( शुभ रंग- जांभळा)

आज कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी आवर्जून वेळ काढावा लागणार आहे. आज जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. तरुण मंडळी जास्तीत जास्त व्हाट्सअप वर बिझी राहतील.

मकर- ( शुभ रंग – निळा) : अविश्रांत मेहनतीच्या जोरावर कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध कराल. मृदू वाणीने विरोधकांची मने जिंकाल. संध्याकाळी आवडत्या व्यक्तीच्या सहवासात वेळेचे भान विसराल.

कुंभ- ( शुभ रंग- आकाशी )

आज तुम्ही काहीसे बेफिकीरपणे वागाल. स्वतःचेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. आज थोडा संयम बाळगा, तुमच्या हितचिंतकांचे ही सल्ले विचारात घ्या.

मीन – ( शुभ रंग – सोनेरी )

पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज दिवसाच्या उत्तरार्धात काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेत. रात्रीच्या प्रवासात जागेच राहणे हिताचे राहील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.