Today’s Horoscope 19 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 19 September 2022

वार – सोमवार.

तारीख 19-09-22

शुभाशुभ विचार-07 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – अविधवा नवमी.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.

दिशा शूल- पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- 18.11 पर्यंत आर्द्रा  नंतर पुनर्वसु.

चंद्र राशी मिथुन


आजचे राशिभविष्य

मेष – शुभ रंग- सोनेरी

वास्तु किंवा वाहन खरेदी संदर्भातील व्यवहार आज टाळलेले बरे. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळांना जास्त प्राधान्य देतील. वाहन रस्त्यात नादुरुस्त होण्याची शक्यता आहे सतर्क रहा.

वृषभ- शुभ रंग- चंदेरी

एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल दुरावलेले मित्र आज एकत्र येतील. कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील.

मिथुन- शुभ रंग- हिरवा

आज तुम्हाला जरा अहंकाराची बाधा होऊ शकते. आपल्याच मनाप्रमाणे आज वागाल. कठोर बोलल्याने काही नाती दुरावण्याची शक्यता आहे. कुणालाही मोफत सल्ले वाटप करू नका.

कर्क- शुभ रंग- गुलाबी

कुटुंबात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. आज एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर सापडू शकेल. काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. खर्च प्रमाणाबाहेर वाढेल.

सिंह -शुभ रंग- डाळिंबी

कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. लांबच्या प्रवासात बेसावध राहू नका.

कन्या- शुभ रंग- मरून

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल पण अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घ्याल. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कुणाला वचने देऊ नका.

तूळ- शुभरंग- पांढरा

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक श्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मात्र मुरड घालावी लागणार आहे. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधणे हिताचे राहील.

वृश्चिक- शुभ रंग- मोतिया

कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका काढण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. आज तुमचा दुपारनंतरचा दिवस पूर्ण अनुकूल असून संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआपच वळतील.

धनु- शुभ रंग- भगवा

केवळ भिडस्तपणापायी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. आपल्या जोडीदाराच्या मात्र भावना जपण्याचा प्रयत्न करा.

मकर- शुभरंग- निळा

वैवाहिक जीवनातील मतभेद संध्याकाळी निवळतील. आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अन्यथा आजार बळावेल.

कुंभ- शुभरंग- स्ट्रॉबेरी

दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनातील काही गोड आठवणी मनास आनंद देतील.

मीन- शुभरंग- क्रीम

कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमी युगुलांनी आज न भेटलेले बरे. गृहिणी आज घराची शोभा वाढवण्यासाठी पैसा खर्च करतील अतिव्यस्त दिवस असून गृहिणी घर स्वच्छतेची मोहीम राबवतील.

 

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.