Today’s Horoscope 2 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार –  शुक्रवार. 2 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार –क्षयदीन.
  • आज विशेष – रंगपंचमी, गुड फ्रायडे.
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – ज्येष्ठा.
  • नक्षत्र पाया- तांबे.
  • चंद्र राशी – वृश्चिक.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- जांभळा)

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागेल. कर्ज प्रस्ताव रखडतील. वैवाहिक जीवनात थोडे फार मतभेद असतील. पण फार न ताणता तुम्ही ते सामंजस्याने घ्याल.

वृषभ – (शुभ रंग- मोरपिशी)

मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकलले तर बरे होईल. आज विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस स्थान देऊ नका.

मिथुन – ( शुभ रंग – मोतीया )
व्यावसायिक अडचणींवर जिद्दीने मात कराल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचाच सल्ला मोलाचा असेल. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर विसंबून राहू नका.

कर्क – ( शुभ रंग – मरून)

आज आर्थिक आवक उत्तम राहील. मुलांच्या मागण्या हौशीने पुरवाल. कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो.

सिंह –( शुभ रंग- डाळिंबी)

काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश सोपे होईल. गृहिणी आपल्या आवडत्या छंदातूनही चांगली कमाई करतील.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. भावंडांचे मात्र आज एकमेकांना चांगले सहकार्य राहील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. वाहन दुरुस्ती चा खर्च उद्भवू शकतो.

तूळ – ( शुभ रंग- निळा)

तरुणांनी आपल्या मर्यादेत राहणे हिताचे उद्धटपणास लगाम गरजेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यायला हवी. ज्येष्ठ मंडळींना कदाचित डेंटिस्ट ची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल

वृश्चिक – (  शुभ रंग- केशरी)

आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील. घरातील थोरांशी काही क्षुल्लक कारणांवरून वाद होतील. आज तुम्ही हट्टीपणाने काही चुकीचे निर्णय घ्याल. स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल.

धनु – ( शुभ रंग- आकाशी )

व्यावसायिक स्पर्धेस तोंड देण्यासाठी नव्या योजना राबवाव्या लागतील. जुने विचार गुंडाळून ठेवावे लागतील.  आज बिनधास्त खर्च करा. बचतीचा विचार आज तरी सोडूनच द्या.

मकर – ( शुभ रंग – पिस्ता)

कार्यक्षेत्रातील तुमच्या पूर्वीच्या कष्टांची फळे दृष्टिक्षेपात येतील तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज काही रखडलेली किचकट कामेही मार्गी लागतील. संध्याकाळी आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

कुंभ – ( शुभ रंग -पांढरा )

आज तुम्ही रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल आपल्या कामातील तत्परतेने वरिष्ठांची मने जिंकाल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन ची चाहूल लागेल.

मीन  – ( शुभ रंग- हिरवा )

आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. यथाशक्ती दानधर्म कराल. वडीलधाऱ्यांच्या वयाचा मान राखाल. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या मात्र स्वीकारू नका.

 

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.