Today’s Horoscope 20 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  शनिवार, ​दि​. 20 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार — अनिष्ट दिवस.
  • आज विशेष — दुर्गाष्टमी.
  • राहू काळ – सकाळी ०९.०० ते १०.३०.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रोहिणी.
  • चंद्र राशी –  वृषभ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- आकाशी)

आज विविध मार्गाने पैसा येईल. खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. गृहिणी कौटुंबिक जबाबदारी हसतमुखाने पार पाडतील. आनंदी दिवस. कदाचित दंतवैद्याची भेट घ्यावी लागेल.

वृषभ – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन बाळगून निस्वार्थीपणे काही कामे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की मिळेल. सज्जनांच्या सहवासात विचार प्रगल्भ होतील. उपवरांना स्थळे सांगून येतील.

मिथुन – ( शुभ रंग -मोरपिशी )

आज कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

कर्क – ( शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. उत्पादनांचा दर्जाही वाढवावा लागणार आहे. राशीच्या लाभातून होणारे चंद्रग्रहण अनपेक्षित पैसा मिळवून देईल.

सिंह – (शुभ रंग – डाळिंबी)

अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका. कायदा मोडण्याचा विचार स्वप्नातही करू नका.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)

शासकीय कामे रखडतील. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. सत्संनाने  मानसिक बळ मिळेल. आजी-आजोबांनी फक्त नातवंडात रमणे हिताचे राहील.

तूळ – ( शुभ रंग- चंदेरी)

नोकरीच्या ठिकाणी आज आपल्या कामाशिवाय फार खोलात शिरू नका. मित्र आज फक्त चुकीचे सल्ले देतील. मोह टाळा. वाहन चालवत असाल तर डोके शांत ठेवा.

वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. वादविवादात तुमचे मत प्रभावी राहील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणून मोकळे होणे संसारिक सुखासाठी चांगले.

धनु – ( शुभ रंग- भगवा)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक नमते घेतील, आज तुम्हाला श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल. काही विसरलेली येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.

मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधान कारक राहील. आज काही जुन्या मित्रांच्या सहवासात सध्याकाळचा वेळ मजेत जाईल.

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)

प्रॉपर्टीचे काही अपुरे व्यवहार मार्गी लागतील. वास्तू व वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होऊ शकेल. अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आज यशादायी दिवस आहे.

मीन – ( शुभ रंग- मरून)

कौटुंबिक वाद असतील तर ते आज दुपारनंतर सुसंवादाने मिटू शकतील. काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. व्यवसायात जाहिरातीवर खर्च करावा लागेल. आज हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.