Today’s Horoscope 20 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 20 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- मंगळवार.

तारीख – 20.02.2024.

शुभाशुभ विचार – 10  नंतर चांगला दिवस.

आज विशेष – जया एकादशी.

राहू काळ – दुपारी 3.00  ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेला असेल.

आज नक्षत्र – आर्द्रा 12.13  पर्यंत नंतर पुनर्वसु.

चंद्र राशी – मिथुन.

—————————–

मेष – ( शुभ रंग – मोरपिशी)

आज एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त तुमचा बराचसा वेळ घराबाहेरच जाईल. प्रतिष्ठितांमधील तुमची उठबस व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने कमी येईल. व्यर्थ वाद टाळा.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रातील पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक बिकट प्रश्न सहजच सुटतील.

मिथुन – ( शुभ रंग- तांबडा)

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असून आज तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. गृहसौख्य लाभेल. आज तुम्ही जोडीदाराला एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.

कर्क – ( शुभ रंग – पिस्ता)

आज जरा स्वतःच्या स्वार्थाकडे लक्ष असू द्या. परमार्थाचा अतिरेक नको. केवळ मोठेपणासाठी न परवडणारा खर्च करू नका. ज्येष्ठांनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी.

सिंह – ( शुभ रंग – जांभळा)

व्यावसायिकांची आवक वाढेल. पैशा अभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. मुलांचे विवाह योग जुळून येतील. आप्तसकीय तुमच्या शब्दाला मान देतील.

कन्या – ( शुभ रंग- राखाडी)

व्यावसायिक आपली टार्गेट पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतील. नोकरदारांना वरिष्ठांचे मूड सांभाळावेच लागतील. मित्र आज तुम्हाला खोटी आश्वासने देतील.

तूळ – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे उल्लंघन करू नका. वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरावा लागेल. काही घरगुती समस्या आज वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटतील.

वृश्चिक-  ( शुभ रंग – क्रीम)

तुमच्या कार्यक्षेत्रात नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकते. आज मोठे आर्थिक व्यवहार जपून करा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवायला हवे.

धनु (शुभ रंग- केशरी)

वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन या कारणाने कार्यक्षेत्रात यशाची कमान चढती राहील. आज वैवाहिक जीवनातही सुसंवाद असेल. गृहसौख्य लाभेल.

मकर – (शुभ रंग- गुलाबी)

आज नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. ज्येष्ठांना काही तब्येतीच्या तक्रारी हैराण करतील. दुकानदारांच्या गल्ल्यात वाढ होईल.

कुंभ – (शुभ रंग- निळा)

उच्चशिक्षित तरुणांच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नव्या विषयात गोडी निर्माण होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आज मुलांचे लाड पुरवण्याचा प्रयत्न कराल.

मीन – ( शुभ रंग- लाल)

आज घरगुती व्यवसाय तेजीत चालतील. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल व त्यांना घराजवळच एखादा रोजगार मिळेल. प्रेम प्रकरणे फक्त मनस्ताप देतील.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.