Todays Horoscope 20 January 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार गुरुवार, दि. 20.01.2022

  • शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आश्लेषा 08.24  पर्यंत, नंतर मघा.
  • चंद्र राशी – कर्क 08.24 पर्यंत, नंतर सिंह.

—————————————

आजचे राशीभविष्य.   

मेष ( शुभ रंग – राखाडी)

नोकरीच्या ठिकाणी कामाचा पसारा आवाक्याबाहेर जाईल. कष्टाच्या प्रमाणात मोबदला कमी असला तरी तुमच्या कामातील उत्साह दांडगा राहील. आज काही मोफत सल्ले देणारी माणसे बोअर करतील.

वृषभ – ( शुभ रंग – मरून )

इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. समाजिक कार्य करणाऱ्यांना समाजात आदर मिळेल.

मिथुन- ( शुभरंग- निळा )

पत प्रतिष्ठा वाढेल आज आप्तस्वकीय तुमच्या शब्दास मान देतील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. हितशत्रू पळवाट शोधतील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस.

कर्क- ( शुभ रंग- मोतिया )

कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. जोडीदारास दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न कराल.

सिंह – (शुभ रंग- आकाशी )

तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा वाद टाळा. हट्टीपणा सोडून आज संयमाने वागण्याची गरज आहे.

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. विरोधक चुका शोधत असतील. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. जुन्या मित्रांच्या भेटीने मन ताजेतवाने होईल.

तूळ- ( शुभ रंग- केशरी )

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आपल्या कर्तुत्वास थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. वाणीत मृदुता हिताची राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. कार्यक्षेत्रात श्रमसफल्या चे समाधान मिळेल. दैव आज तुमच्या बाजूने आहे. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील.

धनु – ( शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद होतील पण फार ताणून धरू नका.

मकर- ( शुभ रंग- आकाशी )

आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आज इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा.

कुंभ- ( शुभ रंग- हिरवा )

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा. कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील.

मीन – ( शुभ रंग- पांढरा)

व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. आज तुमच्या कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. नीती बाह्य वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येईल सतर्क राहा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.