Today’s Horoscope 20 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार… शुक्रवार  , ….. ​दि​. 20 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – सकाळी १०.३०  ते १२.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराषाढा ०९.२२ पर्यंत, नंतर श्रवण.
  • चंद्र राशी –  मकर.

 

 

आजचे राशीभविष्य

मेष –  ( शुभ रंग – गुलाबी )

आज तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा दिवस असेल. तुमचा नोकरी व्यवसायातील मानसन्मान वाढेल. तुमसे कार्यक्षेत्र विस्तारेल.

वृषभ –  (  शुभ रंग – डाळिंबी)

आज आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. रिकामटेकड्या मित्रमंडळींना दुरूनच राम-राम करणे हिताचे. ज्येष्ठ मंडळींना उपासनेची प्रचिती येईल.

 

मिथुन – ( शुभ रंग – मरून)

नवीन झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज काही गोड बोली माणसे भेटतील झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे. आज कामापुरतेच बोला.

कर्क ( शुभ रंग – सोनेरी)

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाचा चांगला प्रभाव राहील. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा आवर्जून प्रयत्न कराल. व्यवसायात अनेक आकर्षक संधी चालून येतील.

सिंह – (शुभ रंग- पांढरा)

आज अती धावपळ टाळा, हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर करण्यास प्राधान्य द्या. येणारी एकही संधी वाया घालवू नका. ज्येष्ठांना आज काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील.

कन्या – ( शुभ रंग – मोतीया)

कौटुंबिक अडचणी आज वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटतील. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमची द्विधा मनस्थिती होणार आहे. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना वाव मिळेल.

तूळ  – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रातील तुमच्या पूर्वीच्या कष्टांचे चीज होईल. यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे फारच मनावर घेतील.

वृश्चिक ( शुभ रंग आकाशी)

उद्योगधंद्यातील महत्त्वपूर्ण करारमदार दुपारपूर्वी उरकून घ्या. नंतर दिवस तितकासा अनुकूल नाही संध्याकाळी वाहन चालवताना सतर्क राहा. शेजाऱ्यांशी सलोखा राहील.

धनु –  ( शुभ रंग- भगवा)

वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. वास्तू व वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. तुमच्या खिशात पैसा खेळता राहील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

मकर – (शुभ रंग- डाळिंबी)

प्रत्येक गोष्ट आपल्याच मनाप्रमाणे व्हावी असा तुमचा अट्टाहास असेल. तरुणांनी मौजमजा करतांना मर्यादांचे उल्लंघन करू नये. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे.

कुंभ –  (शुभ रंग – क्रीम)

नोकरी-व्यवसायात व्यस्तता वाढेल. पारिवारिक सदस्यांच्या गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. गृहिणींना मुलांच्या शिस्तिकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

मीन  ( शुभ रंग – पिस्ता )

व्यावसायिक अडचणी कमी होतील. आधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल.  विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल.
( MPC News च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा 🙏)
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.