Today’s Horoscope 20 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग…रविवार, दिनांक…20 सप्टेंबर 2020

  • शुभाशुभ… १२.०० पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष … विनायक चतुर्थी.
  • राहूकाळ….संध्याकाळी ०४.३० ते ०६.००.
  • दिशा शूल…  पश्चिमेस असेल.
  • नक्षत्र…  स्वाती.
  • आजची चंद्र राशी…  तुळ.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभरंग- पिस्ता)
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. कार्यक्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल. आज तुम्ही आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.


वृषभ(शुभ रंग- राखाडी)
आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरिष्ठांचे समाधान केवळ अशक्य.

 

मिथुन(शुभ रंग पांढरा)
आज तुम्ही आपल्या कर्तव्य पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल. चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी काही जुने मित्र संपर्कात येतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.

 

कर्क(शुभ रंग -जांभळा)
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. मुलांची अभ्यासातील प्रगती तुम्हाला आनंद देईल. आज तुम्ही कदाचित भावनेच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल. कलाकारांची स्ट्रगल चालूच राहील.

 

सिंह(शुभ रंग -आकाशी)
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. काही जुनी तत्त्व गुंडाळून ठेवावी लागतील. घराबाहेर वादविवादात थोडे नमते घेणे हिताचे राहील. आज तुमची तब्येत थोडी नरम असेल

कन्या – (शुभ रंग – निळा)
आज तुमची तब्येत जरा नरम असेल. घरात वडीलधारी मंडळी आपलेच खरे करतील त्यामुळे त्यांच्याशी तुमचे काही मतभेद होण्याची शक्यता आहे, आपले मत त्यांना पटवून सांगण्याचा व्यर्थ खटाटोप करू नका.

 

तूळ(शुभरंग- चंदेरी)
आज अती धावपळ टाळून हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क करण्यास प्राधान्य द्यायला हवे. तुम्हाला कार्यक्षेत्रात काही उत्तम संधी चालून येणार आहेत. त्याचा योग्य वापर करणे तुमच्याच हाती आहे.


वृश्चिक
(शुभ रंग- केशरी)
आज तुम्ही व्यवसायातल्या वाढत्या स्पर्धेने बेचैन व्हाल. दूर चे नातलग आज संपर्कात येतील. गृहिणींना जमा खर्चाचा मेळ बसवणे जरा कठीणच जाईल.

 

धनु(शुभ रंग- पिवळा)
प्रॉपर्टी विषयक काही अपूर्ण व्यवहार पूर्ण होतील. वास्तू व वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होऊ शकते. आज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा दिवस असून आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

 

मकर(शुभारंभ -क्रीम)
कोणत्याही नव्या योजना राबवण्यासाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. अधिकारी वर्गास अधिकार वापरावे लागणार आहेत. कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होईल.

 

कुंभ(शुभ रंग -तांबडा)
नोकरीच्या ठिकाणी आज आपण बरे की आपले काम बरे असेच धोरण ठेवा. वरिष्ठांच्या फार जवळ जाऊ नका. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे. कुटुंबीयांना वेळ देण्याचा प्रयत्न करा.

 

मीन(शुभरंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्हाला काही गोडबोली माणसे भेटतील, कोणाच्या काही सांगण्यावर लगेच विश्वास ठेवू नका  आज कोणतेही धाडस नकोच. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.