Today’s Horoscope 20 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 20 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार

20.09.2023.

शुभाशुभ विचार- 15 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- ऋषी पंचमी.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – विशाखा 14.59 पर्यंत नंतर अनुराधा.

चंद्र राशी – तूळ 08.44 पर्यंत नंतर वृश्चिक.

————— ———————

मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नोकरीच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणार नाही. आज जोडीदाराला दिलेला शब्द पाळावा लागेल.

वृषभ (शुभ रंग- आकाशी )

केवळ मोठेपणासाठी आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची ही गरज आहे.

मिथुन ( शुभ रंग- निळा )

आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी नीवळतील. शब्द जपून वापरायला हवेत.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील.

सिंह (शुभ रंग- गुलाबी)

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

कन्या ( शुभ रंग- हिरवा )

वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकु शकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. काही दुरावलेली नाती आज जवळ येतील.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)

आज आपल्याच मनाप्रमाणे वागल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलण्याने नात्यात गैरसमज होतील. कुणालाही आज मोफत सल्लेवाटप करू नका.

धनु- (शुभ रंग- भगवा)

काही जणांना महत्त्वाच्या कामासाठी तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरामोठ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. आज एखादी महत्त्वाची वस्तू गहाळ होऊ शकते. सतर्क रहा.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. आज रात्रीच्या प्रवासात बेसावध राहू नका.

कुंभ (शुभ रंग – मोतिया)

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागाल पण अति उत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घेऊन बसाल. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. आज हाती असलेला पैसा जपून वापरा.

मीन -(शुभ रंग – डाळिंबी)

आज कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्ती साठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.