Today’s Horoscope 21 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  रविवार, ​दि​. 21 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी ०४.३० ते ०६.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रोहिणी ०८.४३ पर्यंत, नंतर मृग
  • चंद्र राशी – वृषभ २१.५५ पर्यंत नंतर मिथुन

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग -मोतिया )

आज डोके थंड व वाणीत मृदूता ठेवाल अनेक कष्ट कामे सोपी होतील. तब्येत उत्तम राहील. आर्थिक संकटे पळ काढतील. दूरच्या प्रवासात खोळंबा होईल.

वृषभ – ( शुभ रंग -सोनेरी )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. परंतु कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त कदाचित तातडीने प्रवासास निघावे लागेल.

मिथुन – ( शुभ रंग -केशरी )

लहरी व हट्टी स्वभाव काबूत ठेवा. तुमची मते सगळ्यांनाच पटणार नाहीत. एखाद्या प्रसंगी सामंजस्याने मार्ग काढावा लागेल. आज काही देणी चुकवावी लागतील.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा )

नोकरीत वरिष्ठांकडून उत्तम सहकार्य मिळेल तुमच्या मागण्यांचा आज सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. आज गृहसौख्याचा दिवस असून मित्रपरिवारात तुमच्या शब्दाचा मान राहील.

सिंह – ( शुभ रंग- मरून )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. घरात वडीलधारी मंडळीही त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. ऐकावे जनाचे करावे मनाचे हे धोरण स्वीकारा. वाद नकोत.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी )

अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. मोठया आर्थिक उलाढाली उद्यावर ढकलणे हिताचे. दूरच्या प्रवासात सावध रहा. गृहिणींचा आज देव धर्माकडे ओढा राहील.

तूळ – ( शुभ रंग – चंदेरी )

 कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गात काही अडथळे संभवतात. मानापमानाच्या काही प्रसंगांना तोंड द्यावे लागेल.  शारीरिक कष्टाची कामे करणार्‍यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

वृश्चिक – ( शुभ रंग- आकाशी)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. पत्नीचे सल्ले ऐकून तर घ्या.

धनु – ( शुभ रंग- जांभळा)

 कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. आज विश्रांतीस ही प्राधान्य देणे गरजेचे आहे रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मकर – (शुभ रंग गुलाबी)

विविध मार्गाने आलेला पैसा आज विविध मार्गाने जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील.  आज फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे.

कुंभ – ( शुभ रंग – मोरपिशी)

वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. घरात आर्थिक सुबत्ता नांदेल. मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडतील. प्रेम प्रकरणे मात्र डोक्याला मनस्ताप देतील.

मीन – (  शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातून फक्त गैरसमज पसरतील. आज टेलिफोन व लाईट बिले भरावी लागतील. बेरोजगारांची वणवण चालूच राहील. गृहिणींना मुलांचे अभ्यासात लक्ष घालावे लागेल
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.