Today’s Horoscope 21 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 21 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- बुधवार.

तारीख – 21.02.2024.

शुभाशुभ विचार – शुभ दिवस.

आज विशेष – प्रदोष भीष्म द्वादशी.

राहू काळ – दुपारी 12.00 ते  01.30.

दिशा शूल – उत्तरेला असेल.

आज नक्षत्र – पुनर्वसु 14.18 पर्यंत नंतर पुष्य

चंद्र राशी – मिथुन 7.44  पर्यंत नंतर कर्क.

—————————–

मेष – ( शुभ रंग – राखाडी)

आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काही जण सहकुटुंब प्रवासाला निघतील. कलाकार मंडळींना आज वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आशा वाढतील.

वृषभ – ( शुभ रंग- मोरपिशी)

आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल तुम्हाला इतरांची मते पटणार नाहीत. महत्त्वाच्या वाटाघाटी दिवसाच्या उत्तरार्धात केल्यास यशस्वी होतील. आज प्रवास होतील.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)

एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. विरोधकांशीही गोड बोलून तुम्ही आपला स्वार्थ साधून घ्याल. तुमची आर्थिक बाजूही आज भक्कम असेल.

कर्क – ( शुभ रंग – तांबडा)

तुमची आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणित गोडवा ठेवलात तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवास मात्र त्रासदायक होतील.

सिंह – ( शुभ रंग – अबोली)

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. गृहिणींना पूर्वी केलेली बचत कामी येईल. महत्त्वाची कामे आज दिवसापूर्वी उरकून घेतलेली बरी.

कन्या – ( शुभ रंग- जांभळा)

सकारात्मक राहून व कर्तव्याला प्राधान्य देऊन आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व. दुपारनंतर एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.

तूळ – ( शुभ रंग- क्रीम)

तरुण मंडळी ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करतील. अधिकारी वर्गाला अधिकार वापरावेच लागणार आहेत. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात आज काही किरकोळ अडचणींचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल. संध्याकाळी सज्जन मंडळींच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल.

धनु – (शुभ रंग- गुलाबी)

आज आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. सासुरवाडीकडून एखादा लाभ होऊ शकतो. आज कोणतीही धाडसाची कामे टाळाच.

मकर- (शुभ रंग- केशरी)

वैवाहिक जीवनात सामंजस्य असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्याच प्रभावात राहील.

कुंभ – (शुभ रंग- लाल)

क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी उभ्या राहतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ मात्र नक्की मिळणार आहे.

मीन – ( शुभ रंग- मरून)

कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी तुम्ही वेळ व पैसाही खर्च कराल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.