Todays Horoscope 21 January 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार शुक्रवार , दि. 21.01.2022

  • शुभाशुभ विचार- 09.00 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – संकष्ट चतुर्थी.( चंद्रोदय 21.14)
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मघा 09.43 पर्यंत नंतर पूर्वाफाल्गुनी.
  • नक्षत्र पाया- चांदी
  • चंद्र राशी – सिंह.

—————————————

मेष – ( शुभ रंग -मोतिया )

व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील.  स्थावराचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. आज तुमची तब्येत उत्तम असेल. गृहणी आज स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देतील.

वृषभ – ( शुभ रंग -सोनेरी )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवायची जिद्द बाळगाल. विरोधक तुमचा नाद सोडून देतील. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास ही प्राधान्य द्या.

मिथुन – ( शुभ रंग -केशरी )

कार्यक्षेत्रातील काही अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या जुन्या ओळखी आज कामी येतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. मुले आज खेळण्यास प्राधान्य देतील.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा )

वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पैशाची कमतरता भासणार नाही. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी वाद संभवतात. गृहिणी पाहुण्यांची ऊठबस अगत्याने करतील.

सिंह – ( शुभ रंग- मरून )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. अहंकारास लगाम गरजेचा असेल. आज अति स्पष्टवक्तेपणा टाळा कारण त्यामुळे काही नाती दुरावतील.

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी )

आज शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवून वागलेले बरे, अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. दूरचे प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. मौल्यवान वस्तू जपा.

तुळ – ( शुभ रंग – चंदेरी )

दैवाची उत्तम साथ असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ध्येय प्राप्ती कडे वेगाने वाटचाल कराल. आज दुपारनंतर एखादा धनलाभ संभवतो.

वृश्चिक- ( शुभ रंग- आकाशी)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील.

धनु – ( शुभ रंग- जांभळा)

आज दैव तुमच्याच बाजूने आहे. कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. भाविकांना देव दर्शनाची ओढ लागेल.

मकर – (शुभ रंग गुलाबी)

आज तुम्हाला उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावण्याचा मोह होईल, पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे. आज धाडसाची कामे टाळलेली बरी.

कुंभ – ( शुभ रंग – मोरपिशी)

आज कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. प्रेम प्रकरणांना घरच्यांकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो.

मीन – (  शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण हिताचे राहील. येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
९६८९१६५४२४.
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.