Todays Horoscope 21 June 2022: जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार मंगळवार दि. 21 जून 2022 (Todays Horoscope 21 June 2022)

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – कालाष्टमी. 

राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.00.

दिशा शूल -उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा

चंद्र राशी – मीन.

—————————————-

आजचे राशीभविष्य (Todays Horoscope 21 june 2022)

मेष – ( शुभ रंग -राखाडी)

आज स्वार्था कडे लक्ष असू द्या. दानधर्म करताना आधी स्वतःची शिल्लक तपासा. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळले तर बरे होईल. तातडीचे प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तू सांभाळा.

वृषभ- ( शुभ रंग – मरून )

आत्मविश्वासाने नवे उपक्रम राबवू शकाल. पैशाअभावी रखडलेली कामे सुरू करता येतील. लघु उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. दिवस लाभाचा.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरीत कामाचा ताण वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य राहील. मनाजोगत्या घटना घडतील.

कर्क – (शुभ रंग- गुलाबी)

 

कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा. उपासनेत खंड पडू देऊ नका. आज देव नवसाला पावेल.

सिंह – (शुभ रंग -चंदेरी)

आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. विरोधक टपून बसलेत. कामात चुका नकोत. वाहन चालवताना डोक्यात विचारांची गर्दी नको.

 

कन्या – ( शुभ रंग- पांढरा)

आज नोकरीच्या ठिकाणी हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करून लवकर घर गाठाल.  थोडी चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील.

 

तुळ – (शुभ रंग – नारिंगी)

व्यवसायात ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश निश्चित मिळणार आहे. आज तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा नको.

 

वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)
नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. तुमची काही गुपिते उघड होतील. आज कामापुरतेच बोलणे हिताचे राहील.

 

धनु – (शुभ रंग- निळा )
आज अथक परिश्रम यांच्या साह्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील.  काही योग्य माणसे आज संपर्कात येतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.

 

मकर – (शुभ रंग -आकाशी)
नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील. विनाकारण शेजाऱ्यांच्या भानगडीत लक्ष घालू नका.

 

कुंभ – ( शुभ रंग -जांभळा)
अत्यंत आनंदी उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून. परिवारात सामंजस्य राहील. शब्दांवर नियंत्रण गरजेचे.

 

मीन – ( शुभ रंग- क्रीम)

आज रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून विश्रांतीस प्राधान्य द्या.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन- ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.