Today’s Horoscope 21 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार…  शनिवार, ….. ​दि​. 21 नोव्हेंबर 2020

 

  • शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – सकाळी ०९.००  ते १०.३०.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र –  श्रवण  ०९.५३ पर्यंत  नंतर धनिष्ठा.
  • चंद्र राशी – २२.२६ पर्यंत मकर. नंतर कुंभ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- जांभळा)

संमिश्र फळे देणारा असा आजचा दिवस आहे. विरोधकांचा विरोध  तुमचा उत्साह वाढवणाराच ठरेल. योग्य अधिकारांचा वापर करावाच लागणार आहे.

वृषभ – ( शुभ रंग- निळा)

नवीन उपक्रम हाती घेतले असतील तर त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यशाची खात्री 100% आहे. विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षा वाढतील.

 

मिथुन – (शुभ रंग – हिरवा)

आज नोकरदारांनी फक्त आपल्या वाट्याचे काम करून घर गाठावे. जास्त खोलात शिरलात तर अडचणी वाढतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत रहावे.

कर्क –  (शुभ रंग -मोतिया)

महत्त्वाच्या चर्चेत आधी ऐकून घ्या. आपले मत मांडण्याची आज घाई करू नका. मोठे आर्थिक व्यवहार आज टाळलेत तर बर होईल. आज कोणतीच रिस्क नको.

सिंह – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी यासाठी तुमचा हट्ट राहील. त्यामुळे सहकारी वर्गाची नाराजी ओढवून घ्याल. आज सुसंवाद    गरजेचा आहे. पत्नीचे सल्ले डावलू नका.

कन्या ( शुभ रंग – डाळिंबी )

नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाची की तुमच्यावर मर्जी राहील.  सहकार्‍यांशीही सलोखा राहील. आज संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

तूळ  – (शुभ रंग – मोरपंखी)

आज कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे थोडेसे अवघड जाईल.

वृश्चिक ( शुभ रंग- अबोली)

आज दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. गृहिणींचे गृह उद्योग तेजीत चालतील. कलाकारांना मात्र कामासाठी भटकंती करावी लागेल.

धनु –  ( शुभ रंग- केशरी)

आज काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहतील. घर दुरुस्तीच्या किरकोळ कामात लक्ष घालावे लागेल. बेरोजगारांना नोकरीसाठी  कॉल येतील.

मकर – ( शुभ रंग – क्रीम)

आज काही दुरावलेल्या हित संबंधात संबंधात सुधारणा होईल. काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. आवक चांगली असली तरी बचातीस महत्त्व देणे गरजेचे आहे.

कुंभ – (शुभ रंग – लाल)

सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वी उरककेली बरी. आज स्वावलंबन हेच हिताचे राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घेणे आज गरजेचे राहील.

मीन ( शुभ रंग सोनेरी)

आज तुम्ही आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. एखादी सुरक्षित गुंतवणूक कराल.
( MPC News च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा 🙏)
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.