Today’s Horoscope 21 November 2022 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 21 November 2022
वार – सोमवार.
21.11.2022
शुभाशुभ विचार- 10 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- सोमप्रदोष.
राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – चित्रा.
चंद्र राशी – कन्या 12.30 पर्यंत नंतर तूळ.

—————————————-
मेष – ( शुभ रंग- निळा )
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे पालन काटेकरपणे करा. हाताखालच्या लोकांवर वचक ठेवण्याची गरज आहे.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
आज तुमचा हाऊस मौज करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र परिधान कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज चांगले चालणार आहेत. नवोदित कलावंतांना उत्तम संधी चालून येतील

मिथुन ( शुभ रंग- क्रीम )
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात उत्तम प्रगती दिसून येईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

कर्क (शुभ रंग- हिरवा.)
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची भटकंती होईल. रिकामटेकडी चर्चा वादस कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. आज घराबाहेर वाद संभवतात.

सिंह (शुभ रंग- गुलाबी)
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहजच उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पडतील. आनंदी दिवस.

कन्या ( शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवरांना मनाजोगती स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. इतरांच्या भानगडीत यशस्वी मध्यस्थी कराल.

तूळ ( शुभ रंग- मोरपंखी )Today’s Horoscope 21 November 2022
खर्चाचे प्रमाण वाढले तरीही पैसा कमी पडणार नाही. नवोदित कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. कार्यक्षेत्रातील तुमचे कष्ट कारणी लागतील व यशाची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्ध विशेष चांगला.

धनु- (शुभ रंग- सोनेरी )
नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात उद्दिष्टे गाठण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची आज तयारी असेल.

मकर ( शुभ रंग- निळा)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस आहे. नोकरीत साहेबांचे मूळ सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही अपस्मिक अडचणींचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी )
आज फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कुणालाही शब्द देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. गाडी काळजीपूर्वक चालवा.

मीन -(शुभ रंग – भगवा )
आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हाऊस मौज करताना कायद्याचे उल्लंघन करू नका.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.