Today’s Horoscope 21 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग…सोमवार, दिनांक…21 सप्टेंबर 2020

  • शुभाशुभ… अनिष्ट दिवस.
  • आज विशेष … सामान्य दिवस.
  • राहूकाळ…..सकाळी 07.30 ते 09.00
  • दिशा शूल… पूर्वेस असेल.
  • नक्षत्र… विशाखा 20.49 पर्यंत नंतर अनुराधा.
  • आजची चंद्र राशी… तुळ दुपारी 15.17 पर्यंत नंतर वृश्चिक 

आजचे राशीभविष्य

मेष(शुभ रंग – लाल)
आपलेच खरे करण्याचा अट्टाहास करू नका. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणे अत्यंत गरजेचे आहे. घरात जोडीदाराच्या ही भावना समजून घेणे हिताचे.


वृषभ(शुभ रंग – मोतिया)
आज तुमची आर्थिक स्थिती भक्कम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. आज सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल. कदाचित संध्याकाळी डॉक्टरांची भेट द्यावी लागेल.

 

मिथुन – (शुभ रंग – पिस्ता)
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरीत बदल करायचा असेल तर चांगल्या संधी चालून येतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल 

 

कर्क – (शुभ रंग – पांढरा)
आज काही कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. आज एखाद्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल.

 

सिंह(शुभ रंग – मरून)
आज दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. संध्याकाळी एखाद्या घरगुती कार्यक्रमात हजेरी लावावी लागेल. नेतेमंडळींना दिलेली आश्वासने पाळावी लागतील.  

कन्या – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असले तरीही काळजी करू नका, पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. गृहिणी आज शेजारधर्म जपतील. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील.

 

तूळ – (शुभ रंग – सोनेरी)
उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे आज धोरण राहील. आज वादविवादात आपलेच घोडे पुढे दामटवाल. रागावून निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत येतील.


वृश्चिक
– (शुभ रंग – राखाडी)
व्यवसायिक महत्त्वाचे करार दिवसाच्या उत्तरार्धात करा. आपल्या अती स्पष्टवक्तेपणामुळे काही जिवलग मित्र दुरावण्याची शक्यता आहे. आपल्या शब्दांवर ताबा ठेवा.

 

धनु(शुभ रंग – भगवा)
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

 

मकर – (शुभ रंग – मोरपंखी)
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल.

 

कुंभ(शुभ रंग – निळा)
नोकरीत वरिष्ठ तुम्हाला खोटी आश्वासने देतील. घरात वडीलधार्‍या मंडळींची मते विचारात घ्यावी लागतील. आज तुम्हाला थोडी एकांताची गरज भासेल.

 

मीन – (शुभ रंग – गुलाबी)
व्यवसायात चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. वैवाहिक जीवनात काही लाडिक रुसवे-फुगवे असतील. ज्येष्ठ मंडळी अध्यात्मात रमतील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.