Todays Horoscope 22 April 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – शुक्रवार, 22 एप्रिल 2022
  • शुभाशुभ विचार – 09.00 पर्यंत चांगला दिवस
  • आज विशेष – सामान्य दिवस
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल
  • आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा 20.14 पर्यंत व नंतर उत्तराषाढा
  • चंद्र राशी – धनु

—————————————-

आजचे राशीभविष्य –

मेष – ( शुभ रंग -निळा)

कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. कितीही राबलात तरी वरिष्ठांचे समाधान होणे आज शक्य नाही. आजी-आजोबांनी फार खोलात न शिरता फक्त नातवंडात रमावे.

वृषभ- ( शुभ रंग- निळा)

विरोधक सक्रिय असताना कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. कोणाकडून कसली अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळच येणार नाही.

मिथुन- ( शुभ रंग- गुलाबी)

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. आज जोडीदार तुमच्यावर अगदी बेहद खुश असेल.

कर्क- ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्हाला काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटू शकतात. मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे. कुणाकडे सल्ले मागायला जाऊच नका. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील.

सिंह – ( शुभ रंग – मोतिया)

आज तुम्हाला नेहमीच्या त्याच त्या कामाचा कंटाळा येईल. हौशी मंडळी तर आज चक्क कामावर दांडी मारून जीवाची मुंबई करतील. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

कन्या – ( शुभ रंग – लाल )

आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. सासूबाईंनी केलेल्या कौतुकामुळे गृहणी सुखावतील. काही भाग्यवंतांची वास्तुविषयक स्वप्ने साकार होतील

तुळ – (शुभ रंग -आकाशी)

आज तुम्हाला एखाद्या अर्जंट कामासाठी अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर डोके शांत ठेवा. वाद टाळा. शेजारी आज  फारच गोड गोड बोलतील.

वृश्चिक ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. आज नेत्यांची भाषणे प्रभावी होतील. प्रवास मात्र कंटाळवाणे होतील.

धनु – (शुभ रंग- जांभळा)

तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. एखाद्या प्रश्‍नात सामंजस्याने मार्ग काढावा लागेल. पत्नीचे सल्ले डावलू नका. श्वसनाचे विकार असतील तर काळजी घ्या.

मकर -( शुभ रंग- भगवा)

असा एखादा खर्च उद्भवेल कि जो टाळता येणे शक्य नाही. घरातील थोरांचे ही सल्ले विचारात घेणे आवश्यक राहील. ज्येष्ठ मंडळींनी अती दगदग टाळावी. आज थकवा जाणवेल.

कुंभ – ( शुभ रंग- मरून)

व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल. संतती बाबत काही आनंददायी घटना घडतील. जे मनी योजाल ते तडीस न्याल. गर्भवतींना सुदृढ संततीचा लाभ होईल.

मीन – ( शुभ रंग – नारंगी)

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल इतरांना जे अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवाल. आज तुमच्यासाठी यशदायी दिवस आहे. ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कराल.

!! शुभम भवतु !!

– जयंत कुलकर्णी

फोन 9689165424 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.