Today’s Horoscope 22 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार मंगळवार, दि​. 22 डिसेंबर 2020

  • शुभाशुभ विचार – 12 नंतर चांगला. दिवस.
  • आज विशेष – दुर्गाष्टमी.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा.
  • चंद्र राशी – मीन.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)
आज तुमच्याकडे काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावू नका. कायद्याचे उल्लंघन महागात पडेल. खर्चावर ताबा आज तरी शक्य नाही.

.

वृषभ – (शुभ रंग – पांढरा)
एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. राशीच्या लाभातून चंद्र भ्रमण सुरु आहे तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. विरोधक माघार घेतील.

मिथुन – (शुभ रंग – नारिंगी)
उद्योग व्यवसायात तुमचा प्रगती रथ वेगवान राहील. आज तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर राहतील. आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील.

कर्क – (शुभ रंग – लाल)
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. नवीनच झालेल्या ओळखीत व्यवहार करताना सतर्क राहा. आज एखादा विश्वासातला माणूसही विश्वासघात करू शकेल.

सिंह – (शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्याच्या भानगडीत डोकवाल. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. मुलांची शैक्षणिक प्रगती तुम्हाला समाधान देईल.

.

कन्या – (शुभ रंग – सोनेरी)
उद्योगधंद्यात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काबाड कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही. जीवलग मित्रांमध्ये ही आज काही वैचारिक मतभेद होतील. आज तब्येत जरा नरमच राहील. जोडीदाराशी एकमत राहील.

तूळ – (शुभ रंग – क्रीम)
व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजू नका. काही येणी असतील तर मागितली तर वसूल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग आहे.

वृश्चिक – (शुभ रंग – पिस्ता)
उच्चशिक्षित मंडळींच्या अपेक्षा वाढतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. खेळाडूंना एखाद्या नवीन खेळात रुची निर्माण होईल.

धनु – (शुभ रंग- मरून)
एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल.  एखाद्या घरगुती समारंभात मनासारखा मानपान  मिळाल्याने गृहणी खुश असतील. मागण्या मान्य झाल्याने बच्चे कंपनीही हसतमुख असेल छान दिवस.

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
एखादा पत्ता शोधण्यासाठी आज बरीच पायपीट करावी लागणार आहे. आज कुठलीही गोष्ट सहज मिळणार नाही, तरी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)
आज अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरूच राहील. क्षुल्लक कारणावरून भावंडात मतभेद संभवतात. पण त्यावर सामंजस्याने मार्ग निघेल. प्रवासात दगदग होईल.

मीन – (शुभ रंग – जांभळा)
आज तुम्हाला आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. आज संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीसह मॉलमध्ये फेरफटका माराल. मनसोक्त चैन कराल.

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.