Today’s Horoscope 22 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  सोमवार, ​दि​. 22 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी ०७.३०  ते ९.००.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मृग १०.५८ पर्यंत नंतर आद्रा.
  • चंद्र राशी –  मिथुन.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग -पिस्ता )

नविन झालेल्या ओळखीतून व्यवसायवृद्धीसाठी काही संधी चालून येतील. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क राहायला हवे. गृहिणींनी सासु बाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा ठेवू नये.

वृषभ – ( शुभ रंग -राखाडी )

व्यापाऱ्यांकडे पैशाचा ओघ चांगला राहील. आज काही मनासारख्या घटना घडतील. राजकारणी व्यासपीठ गाजवतील. बेरोजगारांची वणवण थांबून त्यांना मनासारखा रोजगार मिळेल.

मिथुन – ( शुभ रंग -पांढरा )

अत्यंत उत्साहवर्धक दिवस असून नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलाल. आज मित्रांमध्ये न रमता जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

कर्क – ( शुभ रंग- जांभळा )

आज भावना व कर्तव्य या तुमच्या मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आज काही जुन्या चुका निस्तराव्या लागतील. हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका.

सिंह – ( शुभ रंग- क्रीम )

मित्र आज दिलेली आश्वासने नक्की पाळतील. काही कारणाने दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. संध्याकाळी एखादा अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. मोठ्या लोकांची ओळखीतून स्वार्थ साधून घ्या.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ रंग – निळा )

कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक घटना घडतील. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्याच मतावर अडून रहाल. घरातील थोरांचे सल्ले अवश्य घ्या. त्यांच्या वयाचा मान राखा.

तूळ – ( शुभ रंग – गुलाबी )

 कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे. गरजूंना मदत करताना आपल्याही मिळकतीचा अंदाज घ्या.

वृश्चिक – ( शुभ रंग- मोतिया)

आज व्यवसायात महत्त्वाचे करार मदार यशस्वी होतील. जोडीदाराच्या भावना जपण्याचा आज प्रयत्न कराल. आज कुसंगती पासून लांब रहा नीति बाह्य वर्तन अंगाशी येईल.

धनु – ( शुभ रंग- सोनेरी)

आज नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम कराल. काही बिकट प्रसंगांना सहज तोंड द्याल. आज तुम्ही घाईगर्दीत घेतलेला एखादा निर्णय चुकेल. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

मकर – (शुभ रंग – भगवा)

आज तुम्हाला मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यांच्या शिस्तिस प्राधान्य देणे गरजेचे आहे. काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. वेळीच दखल घ्यावी.

कुंभ – ( शुभ रंग – डाळिंबी )

स्थावर इस्टेटी विषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडतील. नवे परिचय होतील. एखाद्या समाजहिताच्या कार्यात तुम्ही अग्रेसर असाल.

मीन – (  शुभ रंग – केशरी)

वास्तू वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. मुलांचा सखोल अभ्यासाकडे कल राहील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like
Leave a comment